पालिका कार्यालय टेकूच्या आधारावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 04:53 AM2018-07-14T04:53:03+5:302018-07-14T04:53:13+5:30

पावसाळ्यात धोकादायक इमारतींना नोटीस बजावून त्या रिकामी करण्याचे काम पालिका करते. मात्र, पालिकेच्या जर्जर इमारतीला टेकूचा आधार देत, त्यात पी-उत्तर विभागाचा कारभार बिनदिक्कतपणे सुरू आहे.

municipal office news | पालिका कार्यालय टेकूच्या आधारावर

पालिका कार्यालय टेकूच्या आधारावर

Next

गौरी टेंबकर-कलगुटकर
मुंबई : पावसाळ्यात धोकादायक इमारतींना नोटीस बजावून त्या रिकामी करण्याचे काम पालिका करते. मात्र, पालिकेच्या जर्जर इमारतीला टेकूचा आधार देत, त्यात पी-उत्तर विभागाचा कारभार बिनदिक्कतपणे सुरू आहे. त्यामुळे कर्मचारी आणि नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. परिणामी, या जर्जर इमारतीची नोटीस पालिकेला कोण बजावणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मालाड (प) लिबर्टी गार्डन परिसरात पी-उत्तर विभागाची ३५ वर्षे जुनी दुमजली इमारत आहे. तळमजल्यावर देखभाल दुरुस्ती विभाग, त्यावर स्थायी समितीचे कार्यालय, दुसऱ्या मजल्यावर जल विभाग आहे. मात्र, या इमारतीचे प्लास्टर निखळून पडत आहे. छत कोसळू नये, म्हणून लोखंडी टेकू तळमजल्यावर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. या इमारतीत पालिकेचे अडीचशे ते तीनशे कर्मचारी बसतात, तसेच येथे दिवसाकाठी हजारो लोक कामा निमित्ताने येत असतात. अशात जर इमारतीस काही अपघात झाला, तर शेकडो लोकांचा यामध्ये निष्कारण बळी जाईल, अशी माहिती काँग्रेसचे मालाडचे ब्लॉक उपाध्यक्ष संतोष चिकणे यांनी दिली.
येथे पालिकेच्या नवीन इमारतीचे काम सुरू आहे. मात्र, ते पूर्ण होण्यास दोन-तीन वर्षांचा अपेक्षीत आहे.

Web Title: municipal office news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.