मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर पालिकेची दंडात्मक कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 06:20 AM2020-07-14T06:20:27+5:302020-07-14T06:21:02+5:30

मुंबईत शहर भागात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

Municipal punitive action against citizens who do not wear masks | मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर पालिकेची दंडात्मक कारवाई 

मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर पालिकेची दंडात्मक कारवाई 

Next

 मुंबई : पश्चिम उपनगरातील रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेने मिशन झिरो हाती घेतले आहे. मात्र सोशल डिस्टन्सिंगबाबत वारंवार सूचना करूनही अनेक ठिकाणी नागरिक मास्क न लावताच घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे पालिकेने मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर या भागातील मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईच्या माध्यमातून आतापर्यंत तीन लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. 
मुंबईत शहर भागात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. परंतु अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, कांदिवली, बोरीवली, दहिसर या भागांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर हा मुंबईतील सरासरी दरापेक्षा अधिक आहे. त्यामुळे पालिकेने तीन आठवड्यांपूर्वी पश्चिम उपनगरात मिशन झिरो सुरू केले. मात्र एकीकडे बाधित रुग्णांना शोधण्याची मोहीम तीव्र केली असताना येथील काही ठिकाणी रहिवासी मास्क वापरत नसल्याचे पालिकेला आढळून आले. नियम मोडणाºया अशा नागरिकांविरोधात दंडात्मक कारवाई पालिकेने सुरू केली आहे.
मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी फिरणाºया अशा २८५ लोकांकडून प्रत्येकी एक हजाराचा दंड वसूल करण्यात येत आहे. यापैकी कांदिवलीमध्ये सर्वाधिक १७९ लोकांवर कारवाई करून सर्वाधिक एक लाख ७९ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर बोरीवलीत २४ लोकांवर आणि दहिसरमध्ये ८२ रहिवाशांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे.
- पालिकेने तीन आठवड्यांपूर्वी पश्चिम उपनगरात मिशन झिरो सुरू केले. मात्र एकीकडे बाधित रुग्णांना शोधण्याची मोहीम तीव्र केली असताना येथील काही ठिकाणी रहिवासी मास्क वापरत नसल्याचे पालिकेला आढळून आले. 

 

Web Title: Municipal punitive action against citizens who do not wear masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.