महापालिका शैक्षणिक वर्षासाठी सज्ज, २० शिक्षकांना मिळणार प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 01:13 AM2020-06-09T01:13:21+5:302020-06-09T01:13:35+5:30
आॅनलाइन व आॅफलाइन पद्धतीने शिकणार : २० शिक्षकांना मिळणार प्रशिक्षण
मुंबई : शाळा नाही, पण नवीन शैक्षणिक सत्र सुरू करण्यासाठी महापालिकेचा शिक्षण विभाग सज्ज झाला आहे. महानगरपालिका शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक सत्र आॅनलाइन आणि आॅफलाइन दोन्ही पद्धतीने सुरळीत कसे सुरू करता येईल? त्यासाठी नेमकी काय आवश्यकता आहे? ते कसे घ्यायला हवे यासाठी तब्ब्ल २०००० महापालिका शिक्षकांचे आॅनलाइन ट्रेनिंग शिक्षण विभागातर्फे आयोजित करण्यात आले आहे. मुंबईतील महापालिका शिक्षकांच्या या ३ दिवस चालणाऱ्या आॅनलाइन ट्रेनिंगला सोमवारी सुरुवात झाली असून टप्प्याटप्प्याने या शिक्षकांचे ट्रेनिंग वेबिनारमार्फत होत असल्याची माहिती पालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली.
या आधी २, ३ आणि ४ मेला झालेल्या आॅनलाइन सेशन्समध्ये शिक्षकांना त्यांना विद्यार्थ्यांना आॅनलाइन व आॅफलाइन शिकविताना येणाºया अडचणी, त्यांचे संभ्रम, त्यांचे शंका निरसन या वेबिनारमध्ये होणार आहे. आधीच्या ट्रेनिंगमध्ये शाळा सुरू करण्यात आल्यानंतर सोशल डिस्टन्सिंग कसे पाळायचे, विद्यार्थ्यांना हात धुण्याच्या शिकवायच्या या साºयाचे ट्रेनिंग देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
जे विद्यार्थी व पालक मुंबईत आहेत त्यांच्यापर्यंत बालभारतीची पुस्तकेही पोहोचविण्याची जबाबदारी १५ जूनपर्यंत शिक्षक पार पाडणार असून त्यासाठी त्यांची मोठी यंत्रणा काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना आॅनलाइन किंवा आॅफलाइन शिक्षण घेताना कोणतीही अडचण येऊ नये
यासाठी ही धडपड असल्याचे त्यांनी म्हटले.
आतापर्यंत २ लाख विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तकांच्या सॉफ्ट कॉपी त्यांच्या फोनवर पोहोचल्या असून १५ जूनपर्यंत मुंबईत उपस्थित विद्यार्थ्यांपर्यंत पुस्तकेही पोहोचणार असल्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.
शिक्षकांना दिल्या जाणाºया आॅनलाइन ट्रेनिंगमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करून कसे पाठवायचे? महत्त्वाच्या छोट्या छोट्या क्लिपिंग्स कशा बनवायच्या, थेट आॅनलाइन वर्ग कसे घ्यायचे? विविध टूल्सचा कसा वापर करायचा या साºयाचे प्रशिक्षण दिले जात आहे. ज्यांच्याकडे अँड्रॉइड फोन त्यांना शिक्षक आॅडिओ, एसएमएस आणि कॉल्सच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहेत अशी माहितीही त्यांनी दिली. जर काही कारणाने पुढील आणखी काळ शाळा सुरू करता आल्या नाहीत, तर साधारणत: आॅक्टोबर महिन्यापर्यंत प्रत्येक आठवड्यात काय शिकवले जाईल? विद्यार्थ्यांपर्यंत आॅनलाइन/आॅफलाइन पद्धतीने कसे पोहोचता येईल याचे नियोजन करण्यात आले असून पुढील १० तारखेपर्यंत ते शिक्षकांपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था व नियोजन करण्यात येत असल्याची माहिती पालकर यांनी दिली.