महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश, शाळा सुरु झाल्या तरच दिली जाणार वर्कआॅडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 02:58 PM2020-09-14T14:58:04+5:302020-09-14T14:59:02+5:30

शाळा बंद असल्या तरी त्यांना गणवेश उपलब्ध व्हावेत या उद्देशाने महापालिकेच्या शिक्षण विभागाने पावले उचलली आहेत. त्यानुसार शाळा सुरु होण्यापूर्वीच ३३ हजार ६५७ विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने गणवेश खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील प्रस्ताव आता महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.

Municipal school students will get uniforms, work order will be given only when the school starts | महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश, शाळा सुरु झाल्या तरच दिली जाणार वर्कआॅडर

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश, शाळा सुरु झाल्या तरच दिली जाणार वर्कआॅडर

Next

ठाणे : कोरोनामुळे शाळा आजही उघडू शकलेल्या नाहीत. परंतु दरवर्षी उशिराने विद्यार्थ्यांना गणवेश मिळत असल्याने पालिकेने यंदा तसाही उशिर केला आहे. सुदैवाने शाळा सुरु झालेल्या नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा सुरु झाल्यानंतर गणवेश व इतर साहित्य देण्याची तयारी पालिकेने केली आहे. त्यानुसार या संदर्भातील येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. यासाठी ४ कोटी ११ लाख ७४ हजार ४६० रुपयांचा खर्च केला जाणार आहे. परंतु याची वर्क आॅर्डर शाळा सुरु होण्यापूर्वीच देण्यात येईल असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
                कोरोनामुळे मार्च पासून लॉकडाऊन घेण्यात आला होता. त्यानंतर आता टप्याटप्याने अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. परंतु, शाळा, महाविद्यालये अद्यापही सुरु झालेली नाहीत. त्यामुळे आॅनलाईन क्लासेसच्या माध्यमातून सध्या घरच्या घरीच विद्यार्थ्यांना ज्ञानाजर्नाचे काम सुरु आहे. परंतु आता शाळा सुरु झाल्यावर विद्यार्थ्यांच्या हाती गणवेश वेळेत मिळावेत या उद्देशाने पालिकेच्या शिक्षण विभागाने आता पावले उचलली आहेत. वास्तविक पाहता यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच शिक्षण विभागाने ही प्रक्रिया सुरु करणे अपेक्षित होते. परंतु यंदा कोरोनामुळे ही प्रक्रिया देखील लांबणीवर पडली आहे. त्यानंतर आता आॅनलाईन महासभेत गणवेश खरेदी करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाच्या वतीने पटलावर ठेवण्यात आला आहे.
शाळा सुरु झाल्यानसल्याने यंदा नवीन किती विद्यार्थ्यांची भर पडणार आहे, याचा अंदाज अद्यापही शिक्षण विभागाला नाही, त्यामुळे मागील वर्षी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा अंदाज बांधून हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्यानुसार बालवाडी ते दहावी पर्यंतच्या सुमारे ३३ हजार ६५७ विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध होणार आहे. यासाठी ४ कोटी ११ लाख ७४ हजार ४६० रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. परंतु हा प्रस्ताव मंजुर झाल्यानंतर शाळा सुरु होण्यापूर्वी सदर कामाची वर्कआॅर्डर दिली जाणार असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
 

Web Title: Municipal school students will get uniforms, work order will be given only when the school starts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.