पालिका शाळांत ‘नो इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स इव्हनिंग’ राबविण्याचा मानस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 01:43 AM2019-01-02T01:43:43+5:302019-01-02T01:43:59+5:30

सोशल मीडियाच्या वाढत्या वापराविरोधात आता विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेऊन आंदोलन छेडायला हवे. यासाठी मुलांनी ‘नो इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स इव्हनिंग’साठी पुढाकार घ्यावा, असे मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले.

 In the municipal schools, there is no intention of implementing 'No Electronic Gadgets Evening' | पालिका शाळांत ‘नो इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स इव्हनिंग’ राबविण्याचा मानस

पालिका शाळांत ‘नो इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स इव्हनिंग’ राबविण्याचा मानस

Next

मुंबई : सोशल मीडियाच्या वाढत्या वापराविरोधात आता विद्यार्थ्यांनीच पुढाकार घेऊन आंदोलन छेडायला हवे. यासाठी मुलांनी ‘नो इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स इव्हनिंग’साठी पुढाकार घ्यावा, असे मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले. महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांशी व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी त्यांनी संवाद साधला, त्या वेळी ते बोलत होते. शहरात मुंबई महानगरपालिकेच्या एकूण ४८० शाळा असून त्यातील तब्ब्ल १७० शाळांनी या संवादात आपला सहभाग दर्शवला होता. या वेळी मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वरदेखील उपस्थित होते.
आठवड्यातून किमान एकदा संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत मुलांनी नो इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स इव्हनिंग पाळायला हवी आणि त्याची जबाबदारी त्यांच्या शाळांनी घ्यायला हवी. त्या वेळेत मुलांनी वाचन, गप्पा, इतर खेळ यांमध्ये गुंतल्यास ते इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सपासून दूर होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासाठी महापालिका शाळांनी येत्या आठवड्यात आपल्या शाळांची नावे शिक्षण विभागाकडे देण्याचे आवाहन केले आहे. हा पॅटर्न यशस्वी झाल्यास तो राज्यभरातील शाळांत राबविण्याचा विचार राज्य शासन करणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी या वेळी स्पष्ट केले.
इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स, स्मार्टफोन्सच्या वाढत्या वापरामुळे त्यांच्या शारीरिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो. शिवाय मुलांच्या शारीरिक क्षमतांवर तसेच बौद्धिक क्षमतांवरही दुष्परिणाम होतो. आज संपूर्ण तरुणाई व्हॉट्सअ‍ॅप, गेम्स आणि सोशल मीडियाची गुलाम झाली आहे. तरुणाईला यापासून दूर ठेवायचे झाल्यास त्याची सुरुवात विद्यार्थी दशेपासूनच करायला हवी. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांनी ‘व्हिडीओ गेम छोडो, मैदानसे नाता जोडो’ हा नारा अंमलात आणण्याचा सल्ला दिला आहे.

शाळांनी घ्यावी जबाबदारी; मुलांनी गॅझेटपासून दूर राहवे
आठवड्यातून किमान एकदा संध्याकाळी ७ ते ९ या वेळेत मुलांनी नो इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स इव्हनिंग पाळायला हवी आणि त्याची जबाबदारी त्यांच्या शाळांनी घ्यायला हवी. त्या वेळेत मुलांनी वाचन, गप्पा, इतर खेळ यांमध्ये गुंतल्यास ते इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सपासून दूर होतील, असा विश्वास शिक्षणमंत्री तावडे यांनी व्यक्त केला. यासाठी पालिका शाळांनी येत्या आठवड्यात शाळांची नावे शिक्षण विभागाकडे द्यावीत. हा पॅटर्न यशस्वी झाल्यास तो राज्यभरातील शाळांत राबविणार असल्याचे त्या वेळी स्पष्ट केले.

Web Title:  In the municipal schools, there is no intention of implementing 'No Electronic Gadgets Evening'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.