Join us  

महापालिकेचे कर्मचारी कौतुकास पात्र; नैसर्गिक आपत्तीत करतात युद्धपातळीवर काम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 2:30 AM

अत्यंत अल्पावधीत मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांनी सांगलीतील पूरपरिस्थिती हाताळून सांगली शहराचा चेहरा बदलला हा आमच्यासाठी आदर्श आहे, असे सांगली-मिरज-कुपवाड पालिकेचे आयुक्त नितीन कापडनीस म्हणाले.

मुंबई : देशभरात कुठेही नैसर्गिक आपत्ती आल्यास मुंबई महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी मदतीसाठी पुढे येतात आणि युद्धपातळीवर काम करून तेथील जनजीवन सुरळीत करतात, असे आमचे कर्मचारी सन्मानास आणि कौतुकास पात्र आहेत, असे प्रतिपादन मुंबई महानगरपालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी केले.म्युनिसिपल मजदूर युनियन आणि म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशन यांच्या वतीने परळ येथे आयोजित सांगली, कोल्हापूर येथे पूरग्रस्तांच्या मदतीला गेलेल्या कामगार व अधिकाऱ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. सूतिकागृहापासून स्मशानभूमीपर्यंत सेवा करणारे कामगार दैनंदिन जीवनात मात्र नागरिकांच्या टीकेचे धनी होतात, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.तसेच आपण खºया अर्थाने गाडगेबाबांचे वंशज आहोत म्हणूनच आपण जनतेची सेवा करायला तत्पर असतो, असे कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त मल्लीनाथ कलशेट्टी म्हणाले. या वेळी मदतीसाठी गेलेल्या ८०० कामगारांसहित जलअभियंते, डॉक्टर, कीटकनाशक अधिकारी, अग्निशमन दल कर्मचारी, देवनार पशुवधगृह कर्मचारी, मलनि:सारण कर्मचारी उपस्थित होते.अत्यंत अल्पावधीत मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांनी सांगलीतील पूरपरिस्थिती हाताळून सांगली शहराचा चेहरा बदलला हा आमच्यासाठी आदर्श आहे, असे सांगली-मिरज-कुपवाड पालिकेचे आयुक्त नितीन कापडनीस म्हणाले.

टॅग्स :मुंबई