पाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 05:42 AM2018-11-21T05:42:35+5:302018-11-21T05:42:46+5:30

मुंबईत २४ तास पाणीपुरवठ्याचे स्वप्न महापालिका दाखवत आहे. मात्र अनेक वस्त्यांमध्ये आजही पाणीपुरवठा पुरेसा व वेळेत होत नाही. अनेक ठिकाणी रात्री दोन वाजता पाणी येत असल्याने मुलींना रात्रभर जागावे लागते.

 Municipal students knocked on water for water | पाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार

पाण्यासाठी विद्यार्थ्यांनी ठोठावले महापालिकेचे द्वार

googlenewsNext

मुंबई : मुंबईत २४ तास पाणीपुरवठ्याचे स्वप्न महापालिका दाखवत आहे. मात्र अनेक वस्त्यांमध्ये आजही पाणीपुरवठा पुरेसा व वेळेत होत नाही. अनेक ठिकाणी रात्री दोन वाजता पाणी येत असल्याने मुलींना रात्रभर जागावे लागते. अनेक ठिकाणी दुसऱ्या वस्तीतून पाणी आणावे लागते. त्यामुळे शाळेत पोहोचायला उशीर होतो किंवा दांडी मारावी लागते. अशा मुलांनी मंगळवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि आयुक्त अजय मेहता यांची भेट घेऊन आपले गाºहाणे मांडले.
जागतिक बाल अधिकार दिनानिमित्त मुंबईतील विविध वस्त्यांमधील विद्यार्थ्यांनी पाणी हक्क समितीच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्यालयात येऊन महापौर व आयुक्तांची भेट घेतली. मुंबईतील १०८ वस्त्यांमध्ये आजही पाण्याची व्यवस्था नाही. झोपडपट्ट्यांमध्ये राहणाºया पाच लाख कुटुंबातील मुलांना पाणी भरण्यासाठी शाळांना दांडी मारावी लागत आहे. दहिसर येथील गणपत पाटीलनगर, मानखुर्द महाराष्ट्रनगर, शिवाजीनगर, रफिकनगर, संक्रमण शिबिर, सह्याद्रीनगर, जामरूषीनगर, मालाड अप्पापाडा, पिंपरीपाडा, कौलनगर, कोकरी आगार ट्रान्झिट कॅम्प आणि आंबुजवाडी या भागांमधील मुलांनी आपल्या विभागातील पाणीपुरवठ्याच्या समस्या मांडल्या. पाणी हक्क समितीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने प्रत्येक माणसाचा मूलभूत अधिकार आणि सर्वांना पाणीपुरवठा करण्यासाठी मुंबई महापालिकेने आपल्या धोरणात बदल करावा, असे न्यायालयाने आदेश दिल्याचे पाणी हक्क समितीने निदर्शनास आणले.

Web Title:  Municipal students knocked on water for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई