पालिका शिक्षक कोरोना संसर्गाच्या भीतीच्या सावटाखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 05:17 PM2020-06-18T17:17:53+5:302020-06-18T17:30:53+5:30

पोषण आहार , क्रमिक पुस्तकांच्या वाटपातून पालक , विद्यार्थ्यांच्या आरोग्याला ही धोका

Municipal teacher Corona under the threat of infection | पालिका शिक्षक कोरोना संसर्गाच्या भीतीच्या सावटाखाली

पालिका शिक्षक कोरोना संसर्गाच्या भीतीच्या सावटाखाली

Next


मुंबई : नवीन शैक्षणिक वर्षाची घोषणा राज्याच्या शिक्षण विभागाकडून नुकतीच करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याआधी पूर्वतयारी करण्यासाठी स्थानिक परिस्थिती पाहून शिक्षकांना शाळेच्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान मुंबईत अनेक पालिका शिक्षकांना तर शाळेत उपस्थित रहा अन्यथा वेतन कपात होईल अशा सूचनाही करण्यात आल्या. अनेक शिक्षकांना शालेय पोषण आहाराचे वाटप, पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याची कामे देण्यात आली आहेत. या सगळ्यात मुंबईच्या संजय नगर येथील उच्च प्राथमिक हिंदी शाळेतील एका शिक्षिकेच्या घरातील नातेवाईक कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती मिळाली आहे.  सदर शिक्षिकेच्या संपर्कात १५ , १६ आणि १७ जून दरम्यान अनेक पालक, विद्यार्थी व सहकारी शिक्षक आल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे त्या शिक्षकेसह इतर सहकारी शिक्षक व पालक घाबरला सल्ल्याची माहिती  महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली.

मुंबई रेड झोनमध्ये येत असताना शिक्षकांना शाळांमध्ये उपस्थित राहण्याचा अट्टाहास का ? कोरोनाचा संसर्ग पसरविण्यासाठी आता शिक्षकांना हाताशी धरणार का ? यामुळे शिक्षकांचे आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सगळ्यांचेच आरोग्य धोक्यात घातले जात आहे असा आरोप दराडे यांनी केला आहे.वाहतुकीची साधने , रेल्वे उपलब्ध नसल्याने वसई , विरार , बदलापूर, ठाणे, टिटवाळा अशा ठिकाणांहून मुंबईत येताना सुरक्षितता धोक्यात येत असल्याची माहिती शिक्षकांनी दिली. सार्वजनिक वाहतूकल व्यवस्था सुरळीत सुरु होईपर्यंत शिक्षकांना शाळांत येण्याची सक्ती करू नये, गावाहून येणाऱ्या शिक्षकांना ही आणखी १५ दिवसांचा अवधी द्यावा अशी मागणी दराडे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्राद्वारे केली आहे. ऑनलाईन शिक्षण चालू आहे. अशा वेळेस शिक्षण विभागाने प्रशासकीय कामकाज करण्याचा आग्रह करू नये. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने जोपर्यंत कोरोनाच्या प्रसारास आळा बसत नाही तो पर्यंत शाळा सुरू करणे धोकादायक आहे. सरकारचे पावसाळी अधिवेशनही ऑगस्टमध्ये घेण्यात येणार आहे. मग नववी दहावीच्या मुलांच्या शाळा सुरु करण्याचा अट्टाहास शिक्षण विभागा का करत आहे ? असा सवाल विचारत हंसराज मोरारजी पब्लिक स्कुलचे शिक्षक उदय नरे यांनी दिली.

अतिरिक्त आयुक्तांनी दिली वर्क फ्रॉम होमची परवानगी
दरम्यान आमदार कपिल पाटील यांनी पालिका शिक्षण विभागाचे अतिरिक्त आयुक्त आशुतोष सलील यांची भेट घेतली असून  मुंबई मनपा तील खाजगी शाळासह सर्व शिक्षकांना वर्क फॉर्म होम ची परवानगी देण्याचे मान्य केले आहे.  तसेच १५, १६ व १७ जून रोजी हजर न राहू शकलेल्या शिक्षकांची पगार कपात होणारं नाही, असे स्पष्ट केले असल्याची महिती शिक्षकभारतीचे सुभाष मोरे यांनी दिली.

Web Title: Municipal teacher Corona under the threat of infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.