Join us

पालिका शिक्षक सर्वेक्षण निधीच्या प्रतीक्षेत

By admin | Published: February 27, 2015 10:33 PM

ठाणे महापालिका हद्दीतील एक हजारहून अधिक शिक्षकांनी आर्थिक आणि जातसर्वेक्षण करून दोन वर्षे लोटली असतानाही त्यांच्या मानधनाच्या दुस-या टप्प्याची १ कोटी ९ लाख २३ हजारांची

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील एक हजारहून अधिक शिक्षकांनी आर्थिक आणि जातसर्वेक्षण करून दोन वर्षे लोटली असतानाही त्यांच्या मानधनाच्या दुस-या टप्प्याची १ कोटी ९ लाख २३ हजारांची रक्कम आजपर्यंत मिळालेली नाही.यासंदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलने आता ठाणे महापालिकेकडे पत्रव्यवहार केला असून ही रक्कम तत्काळ मिळावी, अशी मागणी केली आहे. हा मोबदला मिळावा म्हणून सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष महादेव सुळे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे-पालवे व ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना निवेदन दिले आहे. परंतु, मार्चअखेर ही रक्कम मिळाली नाही तर पालिका मुख्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)