मुंबई : गणेशोत्सवानंतर मुंबईतील रुग्णसंख्या आता ५६ दिवसांनी दुप्पट होऊ लागली आहे. मात्र यावेळी झोपडपट्ट्यांमध्ये नव्हे तर इमारतींमध्ये रुग्णांची वाढ दिसून येत आहे. विशेषत: पश्चिम उपनगरात ७० टक्के रुग्ण इमारतींमधील रहिवासी असल्याचे आढळूून आले आहे. परिणामी, मुंबईतील प्रतिबंधित इमारतींची संख्या वाढली असून, सध्या तब्बल सात हजार ६८० इमारती सील आहेत. ही वाढ गेल्या दोन आठवड्यांमध्ये झाल्याचे समोर आले आहे.कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस ९३ दिवसांवर पोहोचला होता. मात्र १ सप्टेंबरपासून रुग्णांची वाढ झपाट्याने होऊ लागली आहे. मुंबईत आता दुपटीचा कालावधी ५६ दिवसांवर तर दैनंदिन रुग्णवाढीचा सरासरी दर १.२४ टक्के एवढा झाला आहे. झोपडपट्ट्यांमध्ये राहणाº्या रहिवाशांमध्ये कोरोनाशी लढा देण्यासाठी अँटिबॉडी तयार झाल्या आहेत. मात्र इमारतींमध्ये राहणारे रहिवासी लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदाच घराबाहेर पडत आहेत.त्यांच्याद्वारे प्रसार वाढत असल्याने इमारती सील करण्याच्या नियमातही वेळोवेळी बदल केला जात आहे. त्यामुळे १ ते १२ सप्टेंबर या कालावधीत आणखी १३८७ इमारती सील करण्यात आल्या आहेत. एकीकडे सील इमारतींची संख्या वाढून ७६८० वर पोहोचली असताना झोपडपट्ट्यांमधील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या २०ने कमी होऊन ५५७ झाली आहे. दहिसर, बोरीवली, कांदिवली येथे सील इमारतींचे प्रमाण अधिक आहे.
विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईसाठी पाचशे फील्ड आॅफिसर्सलॉकडाऊन खुले होत असताना कोरोनाचा प्रसार वाढू लागला आहे. मात्र अद्यापही अनेक ठिकाणी नागरिक विनामास्क फिरत असल्याचे आढळून आले आहे. सार्वजनिक ठिकाणी तोंडाला मास्क न लावताच फिरणाºया नागरिकांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने पाचशे अधिकाऱ्यांना (फील्ड आॅफिसर्स) तैनात ठेवले आहेत.मात्र आजपासून ही मोहीम तीव्र करताना दंडाची रक्कम एक हजार रुपयांवरून दोनशे रुपये करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजनांबरोबरच तोंडाला मास्क लावणे महापालिकेने बंधनकारक केले आहे. मात्र वारंवार सूचना करूनही अनेक लोक सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरत नसल्याने एप्रिल महिन्यापासून एक हजार रुपये दंड आकारण्यास सुरुवात झाली.तसेच चुकीच्या पद्धतीने मास लावणाºयांना समज देऊन सोडण्यात येत आहे. आतापर्यंत दोन हजार ७९८ नागरिकांकडून एक हजार रुपयांप्रमाणे २७ लाख ४८ हजार ७०० एवढा दंड पालिकेने वसूल केला आहे. मात्र एक हजार रुपये दंडाची रक्कम अधिक असल्याने आता सोमवारपासून दोनशे रुपये आकारण्यास सुरुवात झाली आहे.संपूर्ण मुंबईत ही कारवाई तीव्र करण्यासाठी महापालिका 'फील्ड आॅफिसर'ची नियुक्ती केली आहे. प्रत्यक्ष मुंबईत फिरणाºया घनकचरा व्यवस्थापन खात्यातील अधिकारी यांच्यावर दंड आकारण्याची जबाबदारी असेल. तसेच अनुज्ञापन आणि आरोग्य खात्यातील कर्मचाºयांनाही कारवाईचे अधिकार देण्यात येतील, असे एका अधिकाºयाने सांगितले.