मुंबई : महानगरपालिकेच्या नागरी तंत्रज्ञानावर आधारित स्माईल कौन्सिलअंतर्गत १२ कोटी इतक्या रकमेचे पथदर्शी प्रकल्प ‘इनोव्हेशन इम्प्लीमेंटेशन फंड’ या माध्यमातून राबविण्याचे काम सुरू आहे.
घन कचरा व्यवस्थापनांच्या सेवांसाठी ही पालिका सँडबॉक्स आता कार्यरत आहे, जे क्लीन-टेक प्रकल्पांसाठी नावीन्यपूर्ण क्षेत्र असून, याअंतर्गत पालिकेच्या सँडबॉक्समध्ये दोन सक्रिय प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे पालिकेच्या स्माईल कौन्सिलमुळे नागरी तंत्रज्ञान आधारीत स्टार्टअप्सना प्रोत्साहन आणि बळकटी मिळत आहे. यंदाच्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये यासाठी पालिकेकडून १० कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.
मुंबईची स्टार्टअप इकोसिस्टीम बळकट करण्यासाठी ‘स्माईल’ मुंबईतील नागरिकांच्या विविध समस्यांवर काम करत असून, त्यासाठी उपाय योजना आखत आहे.
अशा उपाययोजना उभ्या करणाऱ्या स्टार्टअप्सना प्रशासनासोबत काम करण्याची संधी दिली जात आहे. या उपक्रमांतर्गत कोस्टल रोडलगतच्या झोपडपट्ट्यांमधील सांडपाण्यावर ही उपाय शोधून काढण्यात आला आहे.