Join us

महापालिकेतही होणार पाच दिवसांचा आठवडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 5:19 AM

कामगार संघटनांकडून काही सुधारणांवर आक्षेप असल्याने यासंदर्भात बुधवारी संध्याकाळी प्रशासनाने त्यांच्याबरोबर यशस्वी चर्चा केली.

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आता मुंबई महापालिकेतही पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. याबाबतचा मसुदा तयार करून आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. मात्र कामगार संघटनांकडून काही सुधारणांवर आक्षेप असल्याने यासंदर्भात बुधवारी संध्याकाळी प्रशासनाने त्यांच्याबरोबर यशस्वी चर्चा केली. त्यानुसार पालिकेची नवीन कार्यालयीन वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असणार आहे.राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पाच दिवसांच्या आठवड्याचा लाभ देण्यात येत आहे. याची अंमलबजावणी मुंबई महापालिकेच्या कर्मचाºयांसाठी लागू केली जाईल. महापालिकेच्या कर्मचाºयांची कार्यालयीन वेळ सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे. पाच दिवसांचा आठवडा लागू करताना पालिकेच्या कर्मचाºयांना ४५ मिनिटे लवकर यावे लागणार असून ४५ मिनिटे उशिरापर्यंत थांबावे लागेल. म्हणजे सध्याच्या कार्यालयीन वेळेपेक्षा दीड तास अधिक काम करावे लागेल.दीड तास वाढवताना सध्याच्या १५ नैमित्तिक रजांऐवजी केवळ आठ रजा करण्यात येणार आहेत. याबाबतचा मसुदा अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब जºहाड यांच्या स्वाक्षरीनंतर आयुक्तांच्या स्वाक्षरीकरिता सादर करण्यात आला आहे. ही बाब प्रशासकीय स्तरावरील असल्याने आयुक्तांची स्वाक्षरी होताच याची थेट अंमलबजावणी होईल. मात्र दीड तास वेळ वाढविणे आणि नैमित्तिक रजा कपात करण्यात येणार असल्याने कामगार संघटनांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत बुधवारी संध्याकाळी पालिका प्रशासन आणि कामगार संघटनांच्या शिष्टमंडळामध्ये चर्चा झाली. त्यानंतर नैमित्तिक रजा कमी न करणे आणि सकाळी १० ते ६ अशी वेळ निश्चित करण्यात आल्याचे कामगार संघटनेचे नेते प्रकाश देवदास यांनी सांगितले.>नेमके काय होणार बदल?महापालिका कर्मचाºयांना दररोज दीड तास काम करावे लागणार.सरकारी कर्मचाºयास १५ नैमित्तिक रजा मिळतात. मात्र पालिका कर्मचाºयांना वर्षाला नैमित्तिक सुट्ट्यांतर्गत १५ ऐवजी ८ सुट्ट्या मिळणार.२४ दिवसांच्या अतिरिक्त सुट्ट्यांसाठी ५० दिवसांइतके काम जास्त करावे लागेल.८ तासांचा एक कार्यालयीन कामकाजाचा दिवस होतो; ही बाब लक्षात घेतल्यास हे ३९६ तास म्हणजे वर्षाला ५० दिवसांइतके अतिरिक्त काम करावे लागेल.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका