पालिका उभारणार १४ हजार स्वच्छतागृहे; बांधकामाचा कालावधी निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 06:30 PM2023-09-13T18:30:24+5:302023-09-13T18:31:51+5:30

मुंबईत  सुमारे १४ हजार सार्वजनिक स्वच्छतागृहे  बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Municipality will build 14 thousand toilets The construction period is fixed | पालिका उभारणार १४ हजार स्वच्छतागृहे; बांधकामाचा कालावधी निश्चित

पालिका उभारणार १४ हजार स्वच्छतागृहे; बांधकामाचा कालावधी निश्चित

googlenewsNext

मुंबई :

मुंबईत  सुमारे १४ हजार सार्वजनिक स्वच्छतागृहे  बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्वच्छतागृह बांधण्यास पालिका आयुक्त व प्रशासक इकबालसिंह चहल यांनी मंजुरी दिली आहे. या कामावर पालिका विभाग कार्यालयांऐवजी मध्यवर्ती खात्यामार्फत देखरेख केली जाणार आहे.

पालिकेने टप्पा ११ अंतर्गत  १९ हजार ८०९ सार्वजनिक स्वच्छतागृहांपैकी १९ हजार ५६ स्वच्छतागृहे बांधली आहेत.  टप्पा क्रमांक १२ अंतर्गत १४ हजार १६६ स्वच्छतागृहे बांधण्यात येणार असून त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छतागृहांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याकडे लक्ष वेधले.  ही कामे कॉर्पोरेट कंपन्यांकडून करून घेण्याची सूचना त्यांनी  केली. त्यामुळे प्रशासनाने निविदा स्थगित ठेवून कॉर्पोरेट कंपन्यांचा सहभाग असलेल्या निविदा मागविण्याचा निर्णय घेतला.

स्थगितीमुळे स्वच्छतागृहांची कामे रखडण्याची भीती व्यक्त करत उपनगर जिल्हा  पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन स्थगिती उठविण्याची मागणी केली. स्थगिती उठविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर पालिकेने स्वच्छतागृह बांधण्याचा निर्णय घेतला.

टप्पा १२ अंतर्गत बांधल्या जाणाऱ्या स्वच्छतागृहांमध्ये म्हाडाच्या जुन्या आणि धोकादायक स्वच्छतागृहांचाही समावेश आहे. ती बांधण्यासाठी कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

शौचालयांसाठी लागणारा कालावधी
 २० शौचकुपांपेक्षा कमी    ६ महिने
२० ते ४० शौचकुप    ९ महिने
४१ व त्यापेक्षा अधिक    १२ महिने 

खर्च
९३.६८ कोटी शहर विभाग
९३.६८ कोटी पूर्व व  पश्चिम उपनगर

Web Title: Municipality will build 14 thousand toilets The construction period is fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई