Join us

पालिकेच्या  ‘जेंडर अँड आयडेंटीटी’ ला मिळवले अव्वल; आयुक्तांकडून कलाकारांचे कौतुक

By सीमा महांगडे | Published: January 10, 2024 5:11 PM

६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा

मुंबई- नुकत्याच पार पडलेल्या ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत मुंबई-३ केंद्रातून मुंबई महानगरपालिकेच्या दोन नाटकांनी प्रथम आणि तृतीय पारितोषिक पटकावले आहे. त्यात ‘जेंडर अँड आयडेंटीटी’ या नाटकाला प्रथम आणि ‘पुढच्या वर्षी लवकर या’ या नाटकाला तृतीय पारितोषिक जाहीर झाले आहे. या शिवाय स्वराज्य फाउंडेशन, मुंबई या संस्थेच्या ‘फियर फॅक्टर’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांनी केली आहे. पालिकेच्या ‘जेंडर अँड आयडेंटीटी’ आणि ‘फियर फॅक्टर’ या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे १६ डिसेंबर २०२३ ते ८ जानेवारी २०२४ या कालावधीत साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे आयोजित ६२ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे मुंबई-३ केंद्रावरील निकाल नुकतेच जाहीर झाले. या स्पर्धेत एकूण १८ नाट्य प्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून डॉ. राजीव मोहोळ, बाळ बरगाळे आणि गौरी लोंढे यांनी काम पाहिले.

स्पर्धेचा निकाल‘जेंडर अँड आयडेंटीटी’ या नाटकातील उत्कृष्ट अभिनयासाठी पालिकेचे प्रमुख राजशिष्टाचार अधिकारी व संपर्क अधिकारी अमित वैती यांना रौप्यपदक जाहीर झाले आहे. तसेच बकुळ धवणे यांना ‘द फियर फॅक्टर’ या नाटकातील भूमिकेसाठी रौप्यपदक जाहीर झाले आहे.दिग्दर्शान- राजेंद्र पोतदार (प्रथम, नाटक - जेंडर अँड आयडेंटीटी)

समीर पेणकर (द्वितीय, नाटक - द फियर फॅक्टर ) 

प्रकाश योजना - श्याम चव्हाण (प्रथम, नाटक - एलिजीबीलीटी),

संजय तोडणकर (द्वितीय, नाटक - अरण्यदाह) 

नेपथ्य-  पंकज वेलिग (प्रथम, नाटक - जेंडर अँड आयडेंटीटी )

रजनिश कोंडविलकर (द्वितीय, नाटक - पुढच्या वर्षी लवकर या) 

रंगभूषा - राजेश परब (प्रथम, नाटक - एलिजीबीलीटी )

आनंद एकावडे (द्वितीय, नाटक- सखी उर्मिला) 

अभिनय- सविता चव्हाण (नाटक- साठा पत्रोत्तराची कहाणी असफल अपूर्ण)

इशा कालेकर (नाटक- चाफा बोलेना)

सोनाली जानकर (नाटक- रुद्राक्षा)

भारती पाटील (नाटक-पुढच्या वर्षी लवकर या)

मृदूला अय्यर (नाटक- पुढच्या वर्षी लवकर या)

अमित सोलंकी (नाटक- एलिजीबीलीटी)

सुचित ठाकूर (नाटक-अरण्यदाह)

सचिन पवार (नाटक- जेंडर अॅन आयडेंटीटी), 

महेंद्र दिवेकर (नाटक- साठा पत्रोत्तराची कहाणी असफल अपूर्ण)

 गौरव सातपुते (नाटक-द फियर फॅक्टर)