Join us

पालिकेचे १२ जम्बो कोरोना केंद्र; पोद्दार रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 10:22 PM

मुंबई - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात येत असल्याने महापालिकेने सर्व वैद्यकीय साहित्याची खरेदी सुरू केली आहे. तसेच यावेळी ...

मुंबई - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात येत असल्याने महापालिकेने सर्व वैद्यकीय साहित्याची खरेदी सुरू केली आहे. तसेच यावेळी ऑक्सिजन तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी १२ जंम्बो कोविड केंद्र आणि वरळीतील पोद्दार रुग्णालयात ऑक्सिजन निर्मीती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाद्वारे प्रत्येक मिनिटाला एक लाख तीन हजार लिटर ऑक्सिजन निर्मीती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी पालिका दोनशे कोटी रुपये खर्च करणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार सुरू झाल्यानंतर मुंबईत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. या काळात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. या काळात दररोज २३५ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासत होती. त्यामुळे पालिकेने यापूर्वी १६ रुग्णालयांत ऑक्सिजन निर्मीती प्रकल्प उभारण्याचे काम सुरु केले आहे. हे प्रकल्प जुलैपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, काही ठिकाणी अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. 

आता पोद्दार रुग्णालयसह १२ जंम्बो कोविड केंद्रातही ऑक्सिजन निर्मीती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला कार्यादेश मिळाल्यानंतर ७५ दिवसांत त्याचे काम होणार आहे. तर तीन वर्षांचा देखभाल कालावधी  आहे. 

गंभीर, अति गंभीर रुग्णांसाठी नाही....अतिदक्षता विभाग व व्हेंटिलेटरवरील रुग्णांना उच्च दाबाने ऑक्सिजन पुरवठा करावा लागतो. मात्र, या प्रकल्पातून तेवढ्या दाबाने ऑक्सिजन पुरवता येत नाही. त्यामुळे या प्रकल्पाद्वारे तयार होणारा ऑक्सिजन गंभीर, अति गंभीर रुग्णांसाठी वापरता येणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा ऑक्सिजन गंभीर नसलेल्या परंतु कृत्रिम ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना पुरवता येणार आहे.

दर्जेबाबात साशंकता....हायवे कंस्ट्रक्शन कंपनी आणि जी.एस.एन असोशिएटस या दोन कंपन्यांना हे काम देण्यात आले आहे. मात्र, पालिकेच्या अंदाजित दरापेक्षा कमी किंमतीत हे काम होणार असल्याने कामाच्या दर्जेबाबत साशंकता व्यक्त होत आहे. 

जम्बो केंद्रांमध्ये ऑक्सिजन प्रकल्प....एन.एन.सी.आय वरळी, दहिसर कांदरपाडा, के.जे. सोमय्या मैदान चुनाभट्टी, बीकेसी फेज १, बीकेसी फेज २, दहिसर चेक नाका, गोरेगाव नेस्को, कांजूरमार्ग, मुलूंड रिचर्डस ॲन्ड क्रुडास, मालाड, रेसकोर्स, भायखळा रिचर्ड ॲन्ड क्रुडास या जम्बो कोविड केंद्रासह वरळीतील पोद्दार रुग्णालयात हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसहॉस्पिटल