मुंबई : सुरेल गायकी, लाघवी अभिनयाने अल्पावधीतच मराठी रसिकांच्या मनाला भुरळ घालणारी गायिका आर्या आंबेकर आणि प्रख्यात शास्त्रीय गायक तौफिक कुरेशी यांचे चिरंजीव शिखर नाद कुरेशी हे ‘लोकमत’च्या ‘सूर ज्योत्स्ना’ या राष्ट्रीय संगीत पुरस्काराचे सन्मानार्थी ठरले आहेत. या पुरस्कारांचे वितरण मुंबईत वरळी येथे नेहरू सेंटर येथे आयोजित करण्यात आले आहे. मंगळवार, ९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता दिग्गजांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगणार आहे.
नव्या पिढीतील गायकांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी, यासाठी राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे आणि गायिका कौशिकी चक्रवर्ती आपल्या सहकाऱ्यांसह सादरीकरण करणार आहेत. पुरस्कारप्राप्त कलाकारांच्या रंगारंग गीतांचा कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवण्याची संधीही मुंबईकर रसिकांना मिळणार आहे. कार्यक्रम निमंत्रितांसाठी असून या कार्यक्रमासाठी प्रवेशिकेशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. कार्यक्रमाच्या प्रवेशिकांसाठी ९८३३७१३८५० या क्रमांकावर संपर्क साधावा.विशेष आकर्षण‘सूर ज्योत्स्ना’ या कार्यक्रमात प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांना निखिल फाटक, राजीव तांबे आणि मनोज भांडवलकर साथ देतील. तर गायिका कौशिकी चक्रवर्ती यांना साबिर खान, अजय जोगळेकर आणि सत्यजीत तळवलकर साथ देणार आहेत. संगीतप्रेमी रसिकांसाठी हा कार्यक्रम सुरांची पर्वणी असणार आहे.या मान्यवरांनी केली विजेत्यांची निवडआंतरराष्ट्रीय ख्यातीचे गायक सोनू निगम, रूपकुमार आणि सोनाली राठोड, शास्त्रीय संगीत तज्ज्ञ शशी व्यास, ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा आणि टाइम्स म्युझिकच्या गौरी यादवडकर या मान्यवरांनी सहाव्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे.आर्या आंबेकरनागपूरची आर्या तिच्या आईकडून गायनाचे शिक्षण घेत आहे. आर्याच्या सांगीतिक प्रवासाला एका रिअॅलिटी शोमधून खरा आयाम मिळाला. गायनासोबतच तिने ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून अभिनयाच्या कारकिर्दीस सुरुवात केली. तिचे ‘हृदयात वाजे समथिंग’ हे गाणे प्रसिद्ध आहे. अल्पावधीतच तिने संगीत क्षेत्रात आपला ठसा उमटविला.शिखर नाद कुरेशीशिखर नाद कुरेशी हे शास्त्रीय संगीत कलावंत आहेत. त्यांनी लोकप्रिय कलावंत विक्कू विनायकरामजी व काका उस्ताद झाकीर हुसेन यांच्यासोबत अनेक कार्यक्रम केले. तसेच लुईस बॅँकस, रणजित वारोत, निलाद्रीकुमार व शंकर महादेवन यांच्यासोबतही विविध कार्यक्रमांत ते सहभागी झाले आहेत. बॉलिवूड चित्रपटांकरिता ते संगीतरचना करीत असतात.यापूर्वीच्या पुरस्काराचे मानकरी२०१४च्गायिका - रिवा रूपकुमार राठोडच्गायक - अर्शद अली खान२०१५च्गायिका - पूजा गायतोंडेच्तबला वादक - ओसज अढिया२०१६च्गायिका - अंकिता जोशीच्बासरी वादक - एस. आकाश सतीश२०१७च्गायिका - स्वयंमदुती मजूमदारच्गायक - रमाकांत गायकवाड२०१८च्गायिका - अंजली गायकवाडच्शास्त्रीय गायक - ब्रजवासी ब्रदर्स
प्रवेशिकांंसाठी ९८३३७१३८५० या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा