मुरबाड तालुक्यात अपक्षांनी मारली बाजी

By admin | Published: January 30, 2015 10:46 PM2015-01-30T22:46:50+5:302015-01-30T22:46:50+5:30

नुकत्याच मुरबाड तालुक्यात झालेल्या जि.प .पं.स च्या निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी बहिष्कार टाकला असतांना देखील तालुक्यात अपक्षांनी मात्र निवडणुका लढविल्या

In Murbad taluka, the candidates got beaten | मुरबाड तालुक्यात अपक्षांनी मारली बाजी

मुरबाड तालुक्यात अपक्षांनी मारली बाजी

Next

सरळगांव : नुकत्याच मुरबाड तालुक्यात झालेल्या जि.प .पं.स च्या निवडणुकांमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी बहिष्कार टाकला असतांना देखील तालुक्यात अपक्षांनी मात्र निवडणुका लढविल्या . त्यात पाच पं.स व एक जि.प ची एक अशा सहा बिनविरोध झाल्या व उर्वरीत तीन पं.स च्या व दोन जि.प च्या जागेसाठी निवडणूक होऊन त्यात अपक्ष विजयी झालेत . त्यामुळे मुरबाड तालुक्यातील राजकीय व प्रस्थापितांना झटका देणारी ही निवडणूक ठरली आहे .
राजकीय पक्षांच्या बहिष्काराच्या निर्णयामुळे अपक्ष निवडणुकीसाठी ठाम राहिल्याने प्रथमच पाच पं.स च्या जागा व एक जि.प ची जागा बिनविरोध होऊन उर्वरीत जागांसाठी २८ जानेवारीला झालेल्या तीन पं.स च्या गणांसाठी व दोन जि.प च्या गटासाठी झालेल्या निवडणुकीची मत मोजणी आज मुरबाड येथील संत ज्ञानेश्वर माऊली सभागृहात झाली . यावेळी टोकावडे पं. स च्या गणातून श्याम राऊत, शिवळे गणातून काशिनाथ धुमाळ, तर देवगाव गणातून वसंत जाधव हे विजयी झाले तर नारिवली जि.प गटातून शेखर भोईर व शिरवली जि.प गटातून वैशाली उघडे ह्या विजयी झाल्या आहेत. यंदाच्या या निवडणुकीत मुरबाडकरांनी घराणेशाहीला नाकारले.
(वार्ताहर)

Web Title: In Murbad taluka, the candidates got beaten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.