मालमत्तेच्या वादातून भावाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:07 AM2021-06-16T04:07:37+5:302021-06-16T04:07:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मालमत्तेच्या वादातून भावाने भावाची हत्या केल्याची घटना शिवाजीनगरमध्ये सोमवारी रात्री उशिरा घडली. या प्रकरणी ...

Murder of brother over property dispute | मालमत्तेच्या वादातून भावाची हत्या

मालमत्तेच्या वादातून भावाची हत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मालमत्तेच्या वादातून भावाने भावाची हत्या केल्याची घटना शिवाजीनगरमध्ये सोमवारी रात्री उशिरा घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अक्रम कुरेशी (४०) याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

शिवाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील अहिल्याबाई होळकर मार्गावर अस्लम कुरेशी कुटुंबीयांसोबत राहण्यास होते. सोमवारी रात्री त्यांचा भाऊ अक्रमने घर खाली करण्यास सांगितले. मात्र हे घर आईने दिल्याने त्यांचासुद्धा घरावर अधिकार असल्याचे सांगत त्यांनी घर खाली करण्यास नकार दिला.

यावरून दोघांमध्ये वाद झाले. रागाच्या भरात अक्रमने चाकूने अस्लम यांच्या पोटावर वार केले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निदान डाॅक्टरांनी केले. याप्रकरणी अस्लम याची पत्नी नसरीनने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे. अक्रम पसार असून, शिवाजी नगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

..............................

Web Title: Murder of brother over property dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.