मुंबई : लोकलमध्ये चोरलेल्या मोबाइलच्या वाटणीवरून वाद झाल्याने एका चोरट्याने सहकारी झोपला असताना, झोपेतच त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केल्याची घटना चर्चगेट परिसरात रविवारी रात्री घडली. विक्रम ईनामा (वय २२, रा. मूळ राजस्थान) असे हत्या झालेल्या सहकाºयाचे नाव असून, त्याला मारणाºया विजयन मुथस्वामी तेवर (६५) याला या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे.विक्रम व विजयन हे एकत्र पर्स, सोनसाखळी, मोबाइल आदीच्या चोºया करून जमविलेल्या मालाची आपापसात वाटणी करून घेत असत. शनिवारी त्यांनी पश्चिम मार्गावरील लोकलमध्ये एका प्रवाशाचा मोबाइल चोरला होता. चर्चगेट स्टेशनच्या परिसरातून चोरी केलेला हा मोबाइल विक्रमने परस्पर स्वत:कडेच ठेवून घेतला. वाटणी न मिळाल्यामुळे विजयन नाराज झाला होता. रागाच्या भरात शनिवारी मध्यरात्री विक्रम गाढ झोपेत असताना त्याने त्याच्या डोक्यात दगड घातला. तो झोपेतच गतप्राण झाल्याचे लक्षात येताच विजयनने तेथून पळ काढला.हत्येची माहिती मिळताच आझाद मैदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथील सीसीटीव्ही कॅमेºयाच्या फुटेजवरुन तपासाअंती अखेर पोलिसांनी विजयनचा शोध लावत त्याला अटक केली.
चोरी केलेल्या मोबाइलच्या वाटणीवरून सहकाऱ्याची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 5:31 AM