दादरमध्ये वृद्धेची हत्या

By admin | Published: November 5, 2015 03:30 AM2015-11-05T03:30:13+5:302015-11-05T03:30:13+5:30

दादर येथील उच्चभ्रू इमारतीत एकट्या राहत असलेल्या ५८ वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या डोक्यात फावड्याने घाव घालून हत्या केल्याच्या घटनेने बुधवारी एकच खळबळ उडाली. बेलेझा टॉमी कार्डोज (५८)

The murder of elderly in Dadar | दादरमध्ये वृद्धेची हत्या

दादरमध्ये वृद्धेची हत्या

Next

मुंबई : दादर येथील उच्चभ्रू इमारतीत एकट्या राहत असलेल्या ५८ वर्षीय ज्येष्ठ महिलेच्या डोक्यात फावड्याने घाव घालून हत्या केल्याच्या घटनेने बुधवारी एकच खळबळ उडाली. बेलेझा टॉमी कार्डोज (५८) असे मृत महिलेचे नाव आहे. घरातील लाखोंचा ऐवज चोरी करण्याच्या उद्देशाने घरात दुरुस्तीचे काम करणाऱ्या कामगारांनीच हत्या केल्याचा प्राथमिक संशय वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी शोधकार्य सुरू केले आहे.
दादर येथील लुईस कोर्ट इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक २२, २३ मध्ये कार्डोज कुटुंब राहते. बेलझा सध्या
एकट्याच राहत असून, त्यांच्या घरी रंगकाम व दुरुस्तीचे काम सुरू आहे. कामगार सकाळी १० वाजता यायचे. त्यामुळे त्यांच्या घरी काम करणारी मंगला सुर्वे या दुपारी १२ वाजता येत असत.
बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास घरी आलेल्या सुर्वे यांना बेलेझा बेडरूममध्ये रक्ताच्या थारोळ््यात पडलेल्या दिसल्या. घरातील सामानही पसरलेले होते. शेजारच्यांच्या मदतीने त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शिवाजी पार्क पोलिसांनी हत्येसाठी वापरलेले फावडे, दरवाजा, कपाट यांच्यावरील फिंगर प्रिंट आणि परिस्थितीजन्य पुरावे हस्तगत केले आहे. प्राथमिक तपासात लुटीच्या प्रयत्नात त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये लाखोंचा ऐवज चोरीला गेल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

बेलेझा राहत होत्या एकट्या
६६ वर्षीय पती टॉमी हे मर्चंट नेव्हीमध्ये कामाला आहेत, तर मुलगा बोरीस हा इंग्लंडमध्ये नोकरी करतो. मुलगी टिनाचे लग्न झाले असून, तिही परदेशात वास्तव्यास असते. त्यामुळे बेलेझा या एकट्याच घरी राहत होत्या. गेल्या काही दिवसांपासून कार्डोज यांच्या घरी रंगकाम आणि दुरुस्तीचे काम सुरू होते.

Web Title: The murder of elderly in Dadar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.