Join us

उत्तरप्रदेशात हत्या; मुंबईत आरोपी गजाआड, नेमंक प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 1:10 PM

डॉक्टरला लुटण्याचे गूढ उकलले. 

मुंबई : उत्तरप्रदेश मधील डॉक्टरची लुटीच्या उद्देशाने गोळ्या झाडून हत्या करत मुंबईत पळून आलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने बेड्या ठोकल्या आहेत. मंगेशकुमार संग्राम यादव (२२) असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याच्या जवळून एक पिस्तुल जप्त केले आहे.

उत्तरप्रदेशमधील जलालपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत डॉक्टराची गोळ्या घालून हत्या केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी हा पिस्तूलासह वांद्रे परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष नऊला मिळाली होती. त्यानुसार, कक्षाचे प्रमुख दया नायक यांच्या नेतृत्वातील पथकाने येथील रंगशारदा हॉटेल समोर सापळा रचून यादवला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ एक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली. 

याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन गुन्हे शाखेने यादवला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 

संग्राम यादव सराईत गुन्हेगार...

उत्तर प्रदेशमधील जौनपुरचा रहिवासी असलेल्या यादव याच्या विरोधात उत्तर प्रदेशमधील विविध पोलीस ठाण्यांमध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, मारहाण करणे, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, दंगल घडवुन आणणे असे गंभीर गुन्हे नोंद आहे. लुटीच्या हेतूने डॉक्टरची हत्या केल्यानंतर तो मुंबईत पळून येऊन गोरेगावमधील राम मंदिर परिसरात लपून बसला होता.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीपोलिस