Join us

विवाहितेच्या हत्येचा अखेर पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबईत : लग्नाच्या तीन वर्षांनंतरही मूल झाले नाही, म्हणून सासऱ्यानेच सुनेची हत्या केल्याचे बुधवारी उघड झाले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबईत : लग्नाच्या तीन वर्षांनंतरही मूल झाले नाही, म्हणून सासऱ्यानेच सुनेची हत्या केल्याचे बुधवारी उघड झाले. मालाडच्या आकसा परिसरात नंदिनी कुमार (२२) हिचा मृतदेह सापडल्यानंतर समतानगर पोलीस या प्रकरणी तपास करत होते, ज्यात एकूण तिघांना अटक करण्यात आली आहे.

नंदिनी कुमार (२२) हिचा मृतदेह २४ डिसेंबर, २०२० रोजी मालाडच्या आकसा समुद्र किनाऱ्यावर एका पिशवीत सापडला होता. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी नोंद केली होती. नंदिनी हरवल्याची तक्रार समतानगर पोलिसात दाखल करण्यात आल्याने तिच्या मारेकऱ्यांचा शोध पोलीस घेत होते. त्यानुसार, तिचा सासरा कमल रॉय, त्याला मदत करणारा रिक्षाचालक प्रदीप गुप्ता आणि अजुन एकाला पोलिसांनी अटक केली आहे. दुकानात ढोकळा पोहोचविण्याचे काम कमल करतो. सून नंदिनीला मूल होत नसल्याने तिला आपल्या मुलापासून कायमचे वेगळे करण्याचे त्याने ठरविले. त्यानुसार, छठ पूजेनिमित्ताने मुलगा पंकज याला त्याने मिर्जपूर या गावी पाठविले. त्यानंतर, ८ डिसेंबरच्या रात्री उशीने तोंड दाबून नंदिनीची हत्या केली व गुप्ताच्या मदतीने तिचा मृतदेह बोरीवलीच्या नाल्यात फेकला. जो वाहून समुद्रात गेला आणि २४ डिसेंबर रोजी तो पोलिसांना सापडला.