वडिलांना मारहाण करणाऱ्याची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:04 AM2021-06-23T04:04:57+5:302021-06-23T04:04:57+5:30
मुंबई: वडिलांना मारहाण केल्याच्या रागात एका इसमाचा गळा चिरून हत्या करण्याचा प्रकार दहीसरमध्ये घडला होता. याप्रकरणी सोमवारी संध्याकाळी दहीसर ...
मुंबई: वडिलांना मारहाण केल्याच्या रागात एका इसमाचा गळा चिरून हत्या करण्याचा प्रकार दहीसरमध्ये घडला होता. याप्रकरणी सोमवारी संध्याकाळी दहीसर पोलिसांनी मंगेश गायकवाड (३०) नामक तरुणाला अटक केली. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
दशरथ गायकवाड हे मंगेशचे वडील असून, याच्या बहिणीचे लग्न मयत विनायक गायकवाड यांच्या बहिणीच्या मुलासोबत झाले होते; मात्र तिचे सासरी वारंवार खटके उडत होते. त्यामुळे ती माहेरी निघून आली. तेव्हा दशरथ मुलीच्या सासरच्यांची समजूत काढण्यासाठी २० मे रोजी तिच्या सासरी गेले; मात्र त्यांच्यात हाणामारी झाली. विनायक यांनी दशरथ यांना बेदम मारहाण केली. ज्याचा राग मंगेशच्या मनात होता. अखेर रविवारी रात्री मंगेश केतकीपाडा परिसरात राहणाऱ्या विनायकच्या घरी घुसला आणि त्यांच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत पसार झाला. यात विनायकचा मृत्यू झाला होता.