नवविवाहितेची घरात घुसून हत्या
By admin | Published: December 14, 2014 12:57 AM2014-12-14T00:57:55+5:302014-12-14T00:57:55+5:30
घरात घुसून रुबीना अश्फाक इब्राहिम मन्सुरी (24) या नवविवाहित तरुणीची गळा चिरून निर्घृणपणो हत्या करण्यात आली.
Next
मुंबई : घरात घुसून रुबीना अश्फाक इब्राहिम मन्सुरी (24) या नवविवाहित तरुणीची गळा चिरून निर्घृणपणो हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना शनिवारी दुपारी गोरेगाव पश्चिमेकडील राम मंदिर रोडवरील एमएमआरडीए वसाहतीत घडली. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. गुन्हे शाखाही समांतर तपास करते आहे.
दोन महिन्यांपूर्वी रूबीना आणि अश्फाक यांचा प्रेमविवाह झाला. लगAाआधी रूबीना तिच्या पालकांसह याच वसाहतीत राहत होती. लगAानंतर अश्फाकने वसाहतीतल्या पी-8 इमारतीत भाडय़ाने खोली घेतली. या खोलीत अश्फाकचा धाकटा भाऊ आदील हाही राहत होता. दुपारी दोनच्या सुमारास आपल्या लहान मुलीला शाळेतून घरी घेऊन येणा:या शेजारील महिलेला अश्फाकच्या घराबाहेरील व्हरांडय़ात रक्त दिसले. तिने अश्फाकला बोलावून घेतले. गॅरेजवरून घाईघाईत अश्फाक घरी परतला. घराला बाहेरून कडी होती. कडी उघडून आत शिरलेल्या अश्फाकला हॉलमध्येच रक्ताच्या थारोळ्यात पडलेली रूबीना आढळली.
घटनास्थळी दाखल झालेल्या गोरेगाव पोलिसांना धारदार हत्याराने गळा चिरून अत्यंत निर्घृणपणो हत्या केल्याचे आढळले. शोधाशोध केली तेव्हा मृतदेहाजवळून गुन्ह्यात वापरलेला घरगुती चाकूही सापडला. पोलिसांनी हा चाकू पुढील तपासासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत धाडला आहे.
अंगावरील दागिने तसेच
रूबीनाच्या मृतदेहावर सर्वच दागिने जसेच्या तसे होते. त्यामुळे या हत्येमागे चोरी हा उद्देश नाही हे स्पष्ट झाल्याचे गोरेगाव पोलीस सांगतात. या प्रकरणी पोलीस अश्फाकसह, कुटुंबीय, रूबीनाचे पालक आणि तिला ओळखणा:यांचे जबाब नोंदवणार आहेत. विविध दृष्टिकोनातून या हत्येचा तपास केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
हत्येमागे परिचित
रूबीना कोणत्या वेळी घरी एकाकी असते, इमारतीत फारशी वर्दळ कोणत्या वेळी नसते, हे आरोपीला चांगलेच माहीत होते, असा संशय पोलीस व्यक्त करतात. तसेच हत्येपूर्वी हल्लेखोराने जबरदस्ती दार उघडल्याच्या कोणत्याही खुणा आढळलेल्या नाहीत. त्यामुळे हल्लेखोर रूबीनाच्या ओळखीतला असावा, असा संशयही पोलिसांना आहे.
दारावर रक्ताळलेल्या हाताचे ठसे
रूबीना-अश्फाक यांच्या घराच्या दारावर रक्ताने माखलेल्या हाताचे, पंजाचे ठसे पोलिसांना आढळले आहेत. हत्येनंतर दरवाजाला बाहेरून कडी लावताना हल्लेखोराच्या हाताचे ठसे आढळले. कडी लावताना आरोपीने तेथे हात ठेवल्याची शक्यता आहे. या ठशांवरून पोलीस आरोपीचा शोध लावू शकतात.