मैत्रिणीची छेड काढणाऱ्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 04:11 AM2018-12-07T04:11:09+5:302018-12-07T04:11:15+5:30

मैत्रिणीची छेड काढणा-या एका व्यक्तीची हत्या करण्याचा प्रकार सहा महिन्यांपूर्वी बोरीवली परिसरात घडला होता.

The murderer of a friend is tortured | मैत्रिणीची छेड काढणाऱ्याची हत्या

मैत्रिणीची छेड काढणाऱ्याची हत्या

Next

मुंबई : मैत्रिणीची छेड काढणा-या एका व्यक्तीची हत्या करण्याचा प्रकार सहा महिन्यांपूर्वी बोरीवली परिसरात घडला होता. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य मारेकºयासह दोघांना नुकतीच कर्नाटक राज्यातून अटक केली. सुरेश रामसिंग विश्वकर्मा उर्फ मच्छी (२२) आणि श्रद्धा सुनील पवार (२० ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
बोरीवलीतील शिवाजीनगर परिसरात जुलै महिन्यात अंबादास लक्ष्मण शिंदे (३०) या व्यक्तीची चाकू आणि रॉडने हल्ला करून हत्या करण्यात आली होती. शिंदे हा अभिलेखावरील गुन्हेगार असून त्याच्यावर बोरीवली पोलीस ठाण्यात मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे हा पवार हिची नेहमी छेड काढायचा. मात्र ती त्याच्याकडे दुर्लक्ष करायची. हा प्रकार अनेकदा विश्वकर्मा याच्यासमोरदेखील घडला. पवार आणि विश्वकर्मामध्ये प्रेमसंबंध असल्याने त्याने अनेकदा याबाबत शिंदेची समजूत काढली होती. मात्र तरीदेखील तो सुधारत नव्हता.
जुलै महिन्यात शिवाजीनगरमध्ये हे जोडपे एकत्र बसले असताना शिंदे तिथे आला आणि त्याने पुन्हा पवारबद्दल अश्लील वक्तव्ये करण्यास सुरुवात केली. तेव्हा विश्वकर्मा चिडला आणि त्याने लोखंडी रॉड तसेच चाकूने त्याच्यावर हल्ला करीत त्याला ठार मारले. त्यानंतर तो श्रद्धाला घेऊन पसार झाला.
बोरीवली पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई किरण दळवी यांना विश्वसनीय बातमीदारांकडून हे दोघे कर्नाटक राज्यात लपल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार बोरीवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लक्ष्मण डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोरे, पोलीस शिपाई सचिन खाताते आणि त्यांचे पथक बंगळुरूला रवाना झाले.
त्या ठिकाणी सापळा रचून विश्वकर्मा आणि श्रद्धा यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यांना स्थानिक न्यायालयाने १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याचे तपास अधिकाºयांकडून सांगण्यात आले.

Web Title: The murderer of a friend is tortured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.