Join us

मुरजी पटेल नववी पास तर ऋतुजा लटके पदवीधर, दोन्ही उमेदवारांची संपत्ती किती? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 9:20 PM

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजप यांच्यामध्ये ही प्रतिष्ठेची लढाई मानली जात आहे.

मुंबई-

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजप यांच्यामध्ये ही प्रतिष्ठेची लढाई मानली जात आहे. शिवसेनेतील बंडानंतर ही पहिली मोठी निवडणूक आहे. ऋतुजा लटके या मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तर भाजपाकडून मुरजी पटेल मैदानात आहेत. दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यात दोन्ही उमेदवारांनी निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहिती समोर आली आहे. यामध्ये त्यांनी संपत्ती, शिक्षण, दाखल गुन्ह्याची माहिती यासह इतर माहिती दिली आहे. 

भाजपा उमेदवार मुरजी पटेल यांची उमेदवारी धोक्यात? ती चाल खेळत ठाकरे गटानं वाढवलं टेन्शन 

भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट यांच्याकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली.  निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मुरजी पटेल यांची एकूण संपत्ती १० कोटी ४१ लाख रुपयांची आहे. यापैकी ५ कोटी ४१ लाख रुपये मुरजी पटेल यांच्या नावावर आहे. तर ५ कोटी रुपयांची संपत्ती त्यांच्या मुलांच्या नावावर आहे. अंधेरीमध्ये मुरजी पटेल यांच्या नावावर तीन फ्लॅट आहेत. मुरजी पटेल यांच्याकडे गुजरातमधील कच्छ येथे ३० एकर जमीन आहे. तसंच त्यांच्या पत्नीच्या नावावर कच्छ येथे ३० एकर जमीन आहे.  ही जमीन २०१३-१४ मध्ये ९८ लाख रुपयांमध्ये खरेदी केली होती. या जमिनीची सध्याची किंमत ४ कोटी २५ लाख रुपये इतकी आहे. मुरजी पटेल यांचं शिक्षण नववीपर्यंत झालं आहे. मुरजी पटेल आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर २ कोटी रुपयांचं कर्ज आहे.

मशाल विरुद्ध कमळ आता जनतेच्या कोर्टात; ठाकरे गटातर्फे ऋतुजा लटके, भाजपचे मुरजी पटेल

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.  निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानासुर ऋतुजा लटके यांच्याकडे ४३ लाख ८९ हजार ५०४ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. ऋतुजा लटके यांच्यासह मुलांच्या नावावर १२.३५ एकर जमीन आहे. ऋतुजा लटके यांच्यावर १५ लाख २९ हजाराच गृह कर्ज आहे. ऋतुजा लटके यांच्याकडे ७५ हजार रुपयांची रोख रक्कम आहे. तर त्यांच्या मुलाकडे पाच हजार रुपये आहेत. ऋतुजा लटके यांच्याकडे ५१ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. स्थावर मालमत्तेत त्यांच्या नावे चिपळूणमधील एका घराचा उल्लेख आहे. ऋतुजा लटके यांनी कॉमर्समधून पदवीचं शिक्षण घेतलं आहे. 

टॅग्स :अंधेरीभाजपाशिवसेना