मुरुड आयटीआयचे काम रखडले

By Admin | Published: March 18, 2015 10:39 PM2015-03-18T22:39:27+5:302015-03-18T22:39:27+5:30

मुरुड तालुक्यासाठी शासनाची मंजुरी असलेले एकमेव आयटीआय आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या आयटीआयच्या इमारतीचे काम अपूर्ण असल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

Murud ITI's work ended | मुरुड आयटीआयचे काम रखडले

मुरुड आयटीआयचे काम रखडले

googlenewsNext

नांदगाव : मुरुड तालुक्यासाठी शासनाची मंजुरी असलेले एकमेव आयटीआय आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या आयटीआयच्या इमारतीचे काम अपूर्ण असल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
शासनाकडून निधी प्राप्त होवूनसुद्धा विहित वेळेत काम पूर्ण न केल्याने नवीन प्रशस्त इमारत पूर्णच होवू शकलेली नाही. २००९ मध्ये ७४ लाखांचा निधी प्राप्त होवून तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते. त्यावेळी उच्च तंत्र विभागाचे निर्देशक यांनी जाहीर केले होते की, २०११ रोजी ही इमारत पूर्ण होवून विद्यार्थ्यांना विविध ट्रेड येथे उपलब्ध झालेले असतील. परंतु प्रत्यक्षात मात्र २०१५ साल आले तरी ही इमारत पूर्णच होवू शकली नाही.
आयटीआय केंद्र मुरुड शहरातील दत्तवाडी परिसरात असून पावसात येथे खूप चिखल होतो. बांधकाम विभागाने येथील रस्ता व संरक्षण भिंत बांधण्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
वेळेत काम पूर्ण न झाल्याने आजमितीस बांधकामाचा खर्च दीड कोटीवर गेला आहे. त्यामुळे वाढीव निधी मिळवण्यात बांधकाम खाते अपयशी ठरल्याने काम रखडले आहे. याबाबत बांधकाम खात्याचे उपअभियंता प्रभाकर जाधव यांच्याशी संपर्क साधला असता सर्व कामे दोन महिन्यात पूर्ण करण्यासंबंधी नियोजन केले असल्याचे सांगितले. (वार्ताहर)

नवीन कोर्सलाही विलंब
४ सध्या आयटीआय सर एस.ए. हायस्कूलच्या इमारतीत भरते. परंतु वाढीव ट्रेड अल्प जागेमुळे सुरू होवू शकलेले नाहीत. जर आयटीआयस नवीन इमारत मिळाल्यास एसी, रेफ्रिजरेटर व सिव्हिल ड्राफ्टस्मनसारखे कोर्स सुरू करून विद्यार्थ्यांना नवीन दालन उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने दाखवली आहे. परंतु नवीन इमारत पूर्ण होणार तरी कधी अशी विचारणा शेकडो विद्यार्थी करत आहेत.

Web Title: Murud ITI's work ended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.