मुरुड हेलिकॉप्टर दुर्घटनेतील महिला पायलटचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2018 10:45 AM2018-03-28T10:45:03+5:302018-03-28T10:45:03+5:30
रायगड जिल्ह्यातील मुरुडमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिला पायलट पेनी चौधरी यांचे उपचारादरम्यान मंगळवारी रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील नौदलाच्या हॉस्पिटलमध्ये उपाचार सुरु होते.
मुंबई : रायगड जिल्ह्यातील मुरुडमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिला पायलट पेनी चौधरी यांचे उपचारादरम्यान मंगळवारी रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील नौदलाच्या हॉस्पिटलमध्ये उपाचार सुरु होते.
रायगड जिल्ह्यातील मुरुडमधील नांदगाव-मोरा बंदर येथे 10 मार्चला भारतीय तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर कोसळले होते. हेलिकॉप्टर मुंबईहून मुरुडच्या दिशेने निघाले असताना काशिदजवळ आले असता हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करताना हा अपघात घडला होता. या अपघातात पायलट पेनी चौधरी गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती, तर त्यांच्यासोबत असलेले अन्य तीन जण किरकोळ जखमी झाले होते.
पेनी चौधरी यांना पुढील उपचारांसाठी मुंबईतील नौदलाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर गेले 17 दिवस उपचार सुरु होते. मात्र, त्यांनी मंगळवारी रात्री उशिरा अखेरचा श्वास घेतला.
Coast Guard Assistant Commandant Captain Penny Chaudhary passed away yesterday evening.She was admitted to INHS Asvini hospital after suffering a head injury post hard landing of a coast guard chopper near Mumbai.
— ANI (@ANI) March 28, 2018