पालिकेतर्फे मनपा शाळेत संगीत अकादमी केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 02:14 AM2018-06-20T02:14:45+5:302018-06-20T02:14:45+5:30

महापालिकेच्या सर्व ७ परिमंडळांमध्ये प्रत्येकी १ याप्रमाणे ७ संगीत अकादमी केंद्रे नुकतीच सुरू करण्यात आली आहेत.

Music Academy Center at Municipal school organized by the corporation | पालिकेतर्फे मनपा शाळेत संगीत अकादमी केंद्रे

पालिकेतर्फे मनपा शाळेत संगीत अकादमी केंद्रे

Next

मुंबई : महापालिकेच्या सर्व ७ परिमंडळांमध्ये प्रत्येकी १ याप्रमाणे ७ संगीत अकादमी केंद्रे नुकतीच सुरू करण्यात आली आहेत. या सर्व केंद्रांमध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत पद्धतीनुसार गायन व वादन याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर कथ्थक, भरतनाट्यम व मोहिनीअट्टम या तीन नृत्यशैलींचेदेखील प्रशिक्षण या केंद्रांमध्ये दिले जाणार आहे. या प्रत्येक केंद्रात किमान २५ विद्यार्थ्यांना त्यांच्या कलेनुसार संबंधित कलेतील प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभागाद्वारे शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून परिमंडळनिहाय ७ संगीत अकादमी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ही केंद्रे भायखळा, परळ, सांताक्रुझ, मालाड, चेंबूर, मुलुंड व कांदिवली येथे कार्यान्वित झाली आहेत. केंद्रांमध्ये पारंपरिक वाद्यांसह अत्याधुनिक पद्धतीचे संगीत वाद्य संच उपलब्ध करून घेण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने संवादिनी (हार्मोनियम), तबला, इतर तालवाद्ये, खंजिरी, इलेक्ट्रॉनिक तानपुरा, तबला इत्यादींचा यांचा समावेश आहे.
संगीत अकादमी केंद्रांमध्ये ८७ संगीत शिक्षकांद्वारे गायन, वादन व नृत्य इत्यादींचे प्रशिक्षण देणार आहेत. या प्रत्येक केंद्रामध्ये किमान २५ विद्यार्थी दाखल होतील. विद्यार्थ्यांना सुरुवातीला गाणी, कविता इत्यादी लाइट म्युझिक प्रकारातील प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचा कल पाहून त्यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतानुरूप धडे दिले जाणार आहेत. केंद्रांमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांसाठीदेखील केली जाणार असून त्याचा सर्व खर्च महापालिकेद्वारेच केला जाणार आहे.
आठवड्यातून दोन दिवस प्रशिक्षण
सात प्रशिक्षण केंद्रांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर आठवड्यातून किमान दोन वेळा प्रत्येकी २-२ तासांचे प्रशिक्षण दिले जाईल. आवश्यकतेनुसार संगीत प्रशिक्षणाचे अतिरिक्त वर्ग आयोजित केले जातील.
हे प्रशिक्षण शाळेची वेळ लक्षात घेऊन दिले जाणार आहे. या
विद्यार्थ्यांना संगीत शिकविणाºया ८७ संगीत शिक्षकांचे कौशल्य अधिक विकसित होण्याच्या दृष्टीने त्यांना नियमित स्वरूपात वरिष्ठ-स्तरीय प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या वरिष्ठ-स्तरीय प्रशिक्षणाची व्यवस्था मनपा शिक्षण विभागाच्या दादर हिंदू कॉलनी परिसरातील मुख्यालयात करण्यात आली आहे.

 

Web Title: Music Academy Center at Municipal school organized by the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.