Join us

संगीतकार श्रवण कुमार राठोड यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार श्रवण कुमार राठोड यांचे गुरुवारी कोरोनामुळे निधन झाले. ते ६७ वर्षांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार श्रवण कुमार राठोड यांचे गुरुवारी कोरोनामुळे निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून श्रवण कुमार राठोड यांच्या निधनाची माहिती देत दुःख व्यक्त केले.

राठोड यांना काही दिवसांपूर्वीच कोरोना झाला हाेता. माहीम येथील रहेजा रुग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयविकार तसेच फुप्फुसाचाही त्रास होता. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

९०च्या दशकात नदीम-श्रवण या जोडीने सुपरहिट गाणी दिली होती. चित्रपट आशिकीमधील त्यांच्या संगीताने सगळ्यांना भुरळ घातली होती. ‘साजन’, ‘साथी’, ‘दिवाना’, ‘फुल और कांटे’, ‘राजा’, ‘धडकन’, ‘राज’, ‘दिलवाले’, ‘राजा हिंदुस्तानी’ अशा अनेक चित्रपटांसाठी संगीत दिले होते. श्रवण कुमार राठोड यांच्या निधनाने बॉलीवूडवर शोककळा पसरली असून, त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.