मुंबई : विशिष्ट समाजाच्या लोकांना पालिकेचे अधिकारी पाठीशी घालतात, अशा वादग्रस्त विधानामुळे भाजपाचे गटनेते मनोज कोटक गोत्यात आले आहेत़ अन्सारी या अधिकाऱ्याला उद्देशून हे विधान करण्यात आल्याने, कोटक यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाईचा इशारा समाजवादी पक्षाने दिला आहे़ सर्व विरोधी पक्षांनीच भाजपाविरोधात भूमिका घेतली असताना, शिवसेनेने मात्र युतीचा धर्म पाळलेला नाही. डम्पिंग ग्राउंडवरील डेब्रिज उचलण्याच्या मुद्द्यावर स्थायी समितीच्या बैठकीत आज चर्चा सुरू होती़ घनकचरा व्यवस्थापन खात्यातील प्रमुख अभियंता सिराज अन्सारी हे अन्सारी नावानेच महापालिकेत ओळखले जातात़ त्यांना उद्देशून कोटक यांनी वादग्रस्त विधान केल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला आहे़ या मुद्द्याला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेनेही समर्थन देत सभात्याग केला़कोटक यांनी माफी मागावीकोटक यांनी आपले विधान मागे घेत, अन्सारी व संपूर्ण समाजाची विनाशर्त माफी मागावी, अशी मागणी समाजावादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केली आहे़ कोटक यांनी माफी न मागितल्यास, त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे़ अन्सारी हे मागासवर्गीय असल्याने, कोटक यांच्यावर अॅट्रॉसिटीअंतर्गत कारवाई होऊ शकते का, याची चाचपणी सुरू आहे़ (प्रतिनिधी)
भाजपा गटनेत्यावर मुस्लीम धर्मीय नगरसेवक नाराज
By admin | Published: July 14, 2016 2:26 AM