मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही - विनोद तावडे  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 06:22 AM2019-06-27T06:22:09+5:302019-06-27T06:22:25+5:30

मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावरून शुक्रवारी विरोधकांनी विधान परिषदेत गदारोळ केला.

Muslims can not be given reservation on the basis of religion - Vinod Tawde | मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही - विनोद तावडे  

मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही - विनोद तावडे  

googlenewsNext

मुंबई : मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावरून शुक्रवारी विरोधकांनी विधान परिषदेत गदारोळ केला. त्यावर मुस्लिम समाजातील मागास प्रवर्गाला आजही आरक्षण आहे. मग धर्माच्या आधारावर आरक्षण हवेच कशाला, असा थेट सवाल अल्पसंख्यांक मंत्री विनोद तावडे यांनी केला.
मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्याची मागणी करणारी लक्षवेधी सूचना काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी मांडली. समाजातील सर्व घटकांच्या हिताचे रक्षण करण्याबाबत आमचे सरकार संवेदनशील आहे. मात्र, राज्यघटनेतच धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सत्तेत असताना काँग्रेसने मुस्लिमांच्या विकासासाठी काहीही केलेले नाही. म्हणूनच लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर, ओवेसींनी तुमचे सगळे 'वंचित' घेवून गेले. काँग्रेस मतांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावरून भरकटल्याचा आरोपही तावडे यांनी केला.

मुस्लिम समाजाला मुस्लिम शैक्षणिक संस्थांमध्ये ५० टक्के आरक्षण मिळते. तसेच मुस्लिम समाजातील आरक्षित पोटजातींना आरक्षणाचा लाभ मिळत असल्याच्या तावडे यांच्या दाव्यावर रणपिसे यांनी आक्षेप घेतला. मंत्री दिशाभूल करत असल्याचा आरोप केल्याने सभागृहात गोंधळ झाला. तालुका सभापती हुस्नबानो खलिफे यांनी सभागृह ५ मि. स्थगित केले.

Web Title: Muslims can not be given reservation on the basis of religion - Vinod Tawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.