मुस्लिमांच्या मोर्चाची मुंब्य्रात जय्यत तयारी

By Admin | Published: October 5, 2016 02:43 AM2016-10-05T02:43:01+5:302016-10-05T02:43:01+5:30

आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात काढल्या जाणाऱ्या क्रांती मोर्चाची सुरूवात म्हणून मुस्लिमांतर्फे काढल्या जाणाऱ्या मुंब्य्रातील पहिल्या मोर्चाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे

Muslims prepare for the war in Mumbai | मुस्लिमांच्या मोर्चाची मुंब्य्रात जय्यत तयारी

मुस्लिमांच्या मोर्चाची मुंब्य्रात जय्यत तयारी

googlenewsNext

मुंब्रा : आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात काढल्या जाणाऱ्या क्रांती मोर्चाची सुरूवात म्हणून मुस्लिमांतर्फे काढल्या जाणाऱ्या मुंब्य्रातील पहिल्या मोर्चाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. येत्या शुक्रवारी, ७ आॅक्टोबरला दुपारी २ वाजता या मोर्चाला सुरूवात होईल. शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी, नागरिक, विविध संघटना, राजकीय नेते अशा सर्वांचा सहभाग त्यात असेल.
हा मुस्लिम क्र ांती मोर्चा विशाल असावा, त्यात समविचारी राजकीय संघटनांचा सहभाग वाढावा याचा विचारविनिमय करण्यासाठी शनिवारी बैठक झाली. मंगळवारीही एका सभागृहातील बैठकीत मोर्चाचा आढावा घेण्यात आला. तिला किमान वेतन सल्लागार आयोगाचे अध्यक्ष सय्यद अली अशरफ, मुस्लिम समाजाच्या विविध संघटना, काही धार्मिक संघटना,मौलवी, डॉक्टर संघटनेचे सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, मुंब्रा प्रभाग समितीचे अध्यक्ष अशरफ पठाण, राष्ट्रवादीचे काही नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
मोर्चानंतर जाहीर सभा
मुंब्य्रातील दारु ल फलाह मशिदीपासून रेल्वे स्थानकापर्यंत हा मोर्चा काढला जाईल. राष्ट्रीय महामार्ग क्र मांक चार म्हणजेच शहरातील मुख्य रस्त्यावरून शुक्रवारी दुपारी दोन वाजता मोर्चाला सुरूवात होईल. रेल्वे स्थानकाजवळ त्याचे जाहीर सभेत रु पांतर होईल. तेथेच जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येईल. मोर्चात कोणत्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याचा समावेश नसेल. फक्त राष्ट्रीय ध्वज फडकावला जाईल.
विद्यार्थी, महिलांचा सहभाग
मोर्चात सर्वात पुढे शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, त्यापाठोपाठ तरु ण-तरु णी, विविध संघटनांतील महिला-पुरु ष आणि सगळ््यात शेवटी राजकीय पक्षाचे नेते अशा क्रमाने मोर्चा निघेल. आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचा हा पहिलाच मोर्चा असल्याने तो विशाल व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यात काही विचारवंतांचा समावेश करण्यासाठीही संपर्क सुरू आहे. मुंब्य्रातील मोर्चा हा राज्यात इतर ठिकाणी निघणाऱ्या मोर्चांना मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Muslims prepare for the war in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.