रोहन नाफाडेला ऑल इंडिया रँक ११७, तर इतर ६ विद्यार्थ्यांनी मिळविले ९९ टक्क्यांहून अधिक गुण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :
दोन दिवसांपूर्वी जेईई मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. आकाश इन्स्टिट्यूटच्या मुंबईतील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळविले आहे. मुंबईच्या रोहन नाफाडे येणारे ओळ इंडिया रँक ११७ पटकाविण्यात यश मिळविले असून, इतर ६ विद्यार्थ्यांनाही ९९ टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. जेईई परीक्षा ४ स्तरांमध्ये आयोजित केली जात असून, या चारही परीक्षेत उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातील नामांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश मिळतो. त्यासाठी या परीक्षांचे प्रशिक्षण देणारी संस्था म्हणून आकाश इन्स्टिट्यूट परिचित असे नाव आहे.
देशपातळीवर होणाऱ्या आणि एनटीएकडून आयोजित होणाऱ्या जेईई परीक्षेत यश मिळविण्यासाठी या विद्यार्थ्यांनी आकाशच्या दोन वर्षांच्या क्लासरूम प्रोग्राममध्ये या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. आकाशमधील प्राध्यापकांनी त्यांच्यावर घेतलेल्या मेहनतीला, प्रत्येक संकल्पना समजावून देण्याला या यशाचे श्रेय दिले आहे. "उत्तम अभ्यास सामग्री आणि प्रशिक्षण या दोन्हींमध्ये आकाश इन्स्टिट्यूटने आम्हाला मदत केली. त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, असे विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.
जेईई मुख्य परीक्षेसाठी देशभरातून १० लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. पुणे, मुंबई येथील आकाशमधील विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत, त्यांचे अभ्यासाविषयी समर्पण, जिद्द याबद्दल त्यांची पर्सेंटाइल कामगिरी बरेच काही सांगते, शिवाय त्यांच्या पालकांचे पाठबळ ही त्यांच्यासोबत होतेच, अशी प्रतिक्रिया आकाशमधील विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीबद्दल शुभेच्छा देताना आकाश एज्युकेशनल सर्विसेस लिमिटेड (एइएसएल) चे व्यवस्थापकीय संचालक श्री. आकाश चौधरी यांनी दिली. कोरोनाकाळात विद्यार्थ्यांसाठी कायम उपलब्ध राहता यावे, यासाठी डिजिटल उपस्थितीवर भर देण्यात आला. याशिवाय अभ्यासाचे साहित्य, प्रश्नपेढ्या ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या. तसेच परीक्षेची तयारी, व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करणारी चर्चासत्रेही आयोजित करण्यात आल्याची माहिती चौधरी यांनी दिली.