मस्ट : मिनी लॉकडाऊन : वृत्तपत्र विक्रेत्यांना त्रास देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:06 AM2021-04-09T04:06:33+5:302021-04-09T04:06:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंधांतर्गत वृत्तपत्र विक्रेत्यांना राज्य सरकारने अत्यावश्यक ...

Must: Mini Lockdown: Don't bother newspaper vendors | मस्ट : मिनी लॉकडाऊन : वृत्तपत्र विक्रेत्यांना त्रास देऊ नका

मस्ट : मिनी लॉकडाऊन : वृत्तपत्र विक्रेत्यांना त्रास देऊ नका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंधांतर्गत वृत्तपत्र विक्रेत्यांना राज्य सरकारने अत्यावश्यक सेवेचा दर्जा दिला आहे; मात्र काही ठिकाणी प्रशासकीय यंत्रणांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना जबरदस्तीने स्टॉल बंद करण्यास सांगतल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. परिणामी, वृत्तपत्र विक्रेत्यांना नाहक त्रास दिला जाऊ नये, असे म्हणणे वृत्तपत्र विक्रेत्यांच्या संघटनांकडून मांडले जात आहे.

वृत्तपत्राची छपाई, वितरण, विक्रीवर कोणतेही निर्बंध नाहीत; मात्र तरीही मुंबईत अनेक ठिकाणी वृत्तपत्र विक्रेत्यांना वृत्तपत्रांचे स्टॉल बंद करण्यास सांगितले गेले. अशा प्रकारे नाहक त्रास दिला जात आहे. मुळात कोरोना महामारी सुरू झाल्यापासून वृत्तपत्र विक्रेते आर्थिक अडचणींना सामोरे जात आहेत. आपल्या आरोग्याची काळजी घेत ते वृत्तपत्र पोहोचविण्याचे काम करत आहेत; मात्र आता कठोर निर्बंध लागू झाल्यापासून विनाकारण त्रास होत असल्याचे म्हटले जात आहे. अत्यावश्यक सेवेचा दर्जा असतानाही स्टॉल बंद करण्यास सांगितले तर अडचणी येतील, असे वृत्तपत्र विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ, ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघ, ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता सेना, वृत्तपत्र विक्रेता कल्याण संघ, दादर वृत्तपत्र विक्रेता संघ, दक्षिण मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ, स्वराज्य वृत्तपत्र विक्रेता संघ यांनी युनायटेड फोरमला पत्र लिहिले आहे. त्यानुसार लाॅकडाऊनमध्ये वृत्तपत्र स्टाॅल सुरू राहण्याबाबतचा उल्लेख करण्यात आला आहे. लाॅकडाऊनच्या नावाखाली पोलिसांचा वृत्तपत्र विक्रेत्यांना नाहक त्रास होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. वृत्तपत्र स्टाॅल बंद करण्यास सांगत असल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तसेच शनिवार व रविवार संपूर्ण लाॅकडाऊन असल्याने वृत्तपत्र विक्रेता - वृत्तपत्र स्टाॅल चालु ठेवायचा की नाही, या संभ्रमात आहेत. विक्रेत्याच्या मनात भीतीचे वातावरण आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता युनायटेट फोरम यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टाॅल सुरू ठेवण्याबाबत एक परिपत्रक सरकारकडून मिळवून द्यावे. जेणे करून वृत्तपत्र विक्रेत्यांना स्टॉल लावण्यास परवानगी मिळेल व सर्व खबरदारी घेऊन आपले वृत्तपत्र विक्रीचे नियमित कार्य विक्रेते करू शकतील, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Must: Mini Lockdown: Don't bother newspaper vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.