Join us

म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीसाठी सुंदर पर्याय

By admin | Published: February 21, 2017 5:03 AM

लोकमत आणि बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंड यांच्या वतीने आयोजिलेल्या गुंतवणूक कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई : लोकमत आणि बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंड यांच्या वतीने आयोजिलेल्या गुंतवणूक कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी अत्यंत उपयुक्त अशा गुंतवणूक टिप्सही देण्यात आल्यात. म्युच्युअल फंडही गुंतवणूक क्षेत्राला मिळालेली सुंदर अशी देणगी आहे. तिचा जास्तीत जास्त लाभ गुंतवणूकदारांनी घ्यावा असे आवाहन यावेळी वक्त्यांनी केले. ही गुंतवणूक कार्यशाळा वसई पश्चिमेकडील पापडी येथील दत्तानी स्क्वेअर मॉलमधील तिसऱ्या मजल्यावरील स्वर्ण बँक्वेट सभागृहात शनिवारी १८ फेबु्रवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता पार पडली. या वेळी गुंतवणूकतज्ज्ञ सुयोग काळे आणि बिर्ला सनलाइफ म्युच्युअल फंडचे रिजनल हेड अमित मांजरेकर यांनी म्युच्युअल फंडच्या गुंतवणुकीचे मार्गदर्शन केले. आपला पैसा हा विविध ठिकाणी उपयोगी ठरणार आहे. पैसा, लिक्विड फंड, डेब्ट फंड, शेअर मार्केटमध्ये गुंतवता येतो. पैसा बँकेत किंवा घरात नुसता ठेवला तर त्याचे खरे मूल्य आपल्याला मिळत नाही, तो ही कार्यरत राहिला पाहिजे. या प्रसंगी गुंतवणुकीसंदर्भात छोट्या व्हिडीओ क्लिप्स दाखवण्यात आल्या. अतिशय सोप्या पद्धतीने म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीचे सूत्र समजून सांगितले. श्रोत्यांच्या शंकांचे निरसन मान्यवरांनी केले. कार्यक्रमाची सांगता स्नेह भेट आणि अल्पोपाहार यांच्या आस्वादाने झाली. कुणाल रेगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)गुंतवणूक टीप्स म्युच्युअल फंड फक्त जोखीम नाही ही लाँग टर्म इन्व्हेस्टेमेंट आहे. सेन्सेक्स रोज बघू नका, तो सट्टा नाही. वेळ द्यावा लागेल. ब्रोकरने सांगितले म्हणून इन्व्हेस्टमेंट करू नका, बेस्ट परफॉर्मन्स फंडचा अभ्यास करा, तुमच्या गुंतवणुकीची ओळख ओळखून गुंतवणूक करा.  गुंतवणुकीत ‘हाय रिस्क हाय रिटर्न’ हा फंडा आहे. हे कधीही विसरू नका.