राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण खूपच तापलं आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या पाठीमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागल्याने सत्ताधारी आणि विरोधकांत आरोपप्रत्यारोपांना उधाण आले आहे. राज्यातील शिवसेना नेते सध्या आयकर विभागाच्या रडावर असून यशवंत जाधव यांच्यानंतर आता राहुल कनाल यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे कनाल यांच्या ८ आणि १३ जून २०२० रोजीच्या मोबाईल टॉवरचे लोकेशन आणि सीडीआर तपासल्यास दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा उलगडा होण्यास मदत होवू शकते असा उल्लेख केलेले ट्विट नितेश राणे यांनी केला. तसेच कनाल यांनी या ट्विटला प्रत्युत्तर देत सर्वोच्च यंत्रणेनेनं माझा सीडीआर तपासावा. पण केवळ ८ आणि १३ जुनचा नाही तर संपूर्ण वर्षांचा तपासावा असे ट्विट केले आहे. त्यामुळे दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूला वेगळं वळण लागलं आहे.
शिवसेना नेते राहुल कनाल यांच्यावरील आयकर विभागाच्या धाडीनंतर नितेश राणे यांनी गौप्यस्फोट केला आहे. नितेश राणे यांनी राहुल कनाल यांचा दिशा सॅलियन आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरणाशी संबंध जोडला असल्याने कनाल यांनी ट्विट करत नितेश राणेंना प्रत्युत्तर दिले आहे. कनाल यांच्या ८ आणि १३ जून २०२० रोजीच्या मोबाईल टॉवरचे लोकेशन आणि सीडीआर तपासल्यास दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा उलगडा होण्यास मदत होवू शकते. क्राईम पार्टनर्स असाही आरोप ट्विटच्या माध्यमातून नितेश राणे यांनी केला आहे.
त्यावर राहुल कनाल यांनी यासंदर्भात नितेश राणे यांना प्रत्युत्तर देत ट्विट केलं असून यात त्यांनी आव्हान देत म्हटलं आहे सर्वोच्च यंत्रणेने माझा सीडीआर तपासावा. पण केवळ ८ आणि १३ जूनचा नाही तर संपूर्ण वर्षांचा तपासावा. त्यात जर काही आढळले नाही तर तुम्ही राजीनामा देणार का? कायम लक्षात ठेवा, देव महान आहे आणि कायम सत्यासोबत असतो. लोकांना फोन करतं रहा आणि आनंद घेत रहा, असा उपहासात्मक टोला त्यांनी आमदार नितेश राणे यांना लगावला आहे.