...पण माझा नवरा घाबरणार नाही; ईडी नोटीसप्रकरणी शर्मिला ठाकरेंनी केली राज यांची पाठराखण 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 03:34 PM2019-08-19T15:34:51+5:302019-08-19T15:39:22+5:30

ईडी, सीबीआयची आम्हाला सवय आहे. राज ठाकरेंना दबावात ठेवण्यासाठी हे तंत्र वापरण्यात आलं आहे.

But my husband will not be afraid; Sharmila Thackeray statement on Raj Thackeray ED Notice | ...पण माझा नवरा घाबरणार नाही; ईडी नोटीसप्रकरणी शर्मिला ठाकरेंनी केली राज यांची पाठराखण 

...पण माझा नवरा घाबरणार नाही; ईडी नोटीसप्रकरणी शर्मिला ठाकरेंनी केली राज यांची पाठराखण 

googlenewsNext

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर मिलप्रकरणात ईडीकडून समन्स बजविण्यात आला आहे. २२ ऑगस्टला राज यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात बोलविले आहे. मात्र या नोटिशीवरुन आता सत्ताधाऱ्यांविरोधात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या प्रकरणावर बोलताना राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेंनी हे प्रकरण २००८ चं आहे. आम्ही कोहिनूर मिल व्यवहारातून कधीच बाहेर पडलो आहे. मात्र आमच्यावर सरकारचं खूप प्रेम आहे. आम्हाला अशा अनेक नोटीस येत असतात. आम्ही या नोटिशींना उत्तर देण्यास सक्षम आहोत अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरेंनी दिली आहे. 

यावेळी बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, ईडी, सीबीआयची आम्हाला सवय आहे. राज ठाकरेंना दबावात ठेवण्यासाठी हे तंत्र वापरण्यात आलं आहे. पण माझा नवरा घाबरणार नाही. निवडणुका जवळ आल्याने माझ्या नवऱ्याला चौकशीच्या फेऱ्यात अडकविण्याचा प्रयत्न आहे. मात्र चौकशीसाठी राज ठाकरेंना बोलविलं तर नक्की जाणार, सगळे पेपर त्यांना देऊ असं शर्मिला यांनी सांगितले आहे. 
तसेच भाजपा डोळे मिटून दूध पिणारे मांजर आहे. ज्या पद्धतीने भाजपा विरोधकांवर तुटून पडलेत. सरकारी संस्थांचा वापर हे नेहमीचा गळ आहे. ईडीचा अर्थ आम्हाला माहित नसेल असं त्यांना वाटतं असेल तर आम्ही अनाडी आहोत असा त्यांचा गैरसमज आहे असा टोला शर्मिला ठाकरेंनी भाजपाला लगावला आहे. 

दरम्यान ''पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या भारतातील हिटलर आहेत. राज ठाकरेंना बजावण्यात आलेली ईडीची नोटीस हा केवळ दबावतंत्राचा भाग आहे. गेल्या पाच सहा वर्षांत भाजपाच्या एकाही नेत्याची ईडीकडून चौकशी झालेली नाही. मात्र अशा चौकशांना मनसे घाबरणार नाही, तर हिटलरशाही विरोधातील लढा सुरूच राहील, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.   

काय आहे प्रकरण?
राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणि उन्मेष जोशी यांनी मिळून दादर येथील कोहिनूर मिलची जागा खरेदी केली होती. त्यासाठी आयएलएफएसकडून कर्ज घेतले होते. मात्र त्यानंतर आयएलएफएसचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी २००८ साली या प्रकरणी आपले सर्व शेअर्स विकले होते. मात्र, त्यानंतरही राज ठाकरे या कंपनीत सक्रिय असल्याचे सांगत याप्रकरणाची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी सुरु आहे. 
 

Web Title: But my husband will not be afraid; Sharmila Thackeray statement on Raj Thackeray ED Notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.