माझी नदी, माझी जबाबदारी : नदीसाठी जोडले गेले  ५० हजार नागरिक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 03:16 PM2020-12-01T15:16:06+5:302020-12-01T15:19:05+5:30

My river, my responsibility : लोकसहभागातून नदी पुनरुज्जीवन ही संकल्पना रुजविली.

My river, my responsibility : 50,000 citizens were added to the river | माझी नदी, माझी जबाबदारी : नदीसाठी जोडले गेले  ५० हजार नागरिक

माझी नदी, माझी जबाबदारी : नदीसाठी जोडले गेले  ५० हजार नागरिक

Next

मुंबई : इकॉलॉजिकल सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी २०१४ मध्ये जीवितनदीची स्थापना केली असून, लोकसहभागातून नदी पुनरुज्जीवन ही संकल्पना रुजविली. मुळा, मुठा, रामनदीवर जीवितनदीचे काम सुरु आहे. जीवितनदीशी संलग्न काही नदी योद्धे इंद्रायणी व पवना नद्या, मीना नदी, वेदावती नदी, उल्हास नदी आणि तेरेखोल नदी यावर काम करत आहेत. आता जीवितनदीचे माझी नदी, माझी जबाबदारी हे ब्रीदवाक्य महाराष्ट्रातील विविध भागात स्वीकारले आहे. जीवितनदी मार्फत मुठाई रिव्हर वॉक, दत्तक घेऊया नदी किनारा, घातक रसायन-विरहीत जीवनशैली, मुठाई नदी महोत्सव, नदीकाठी नदीसाठी हे उपक्रम राबविले जातात आणि याद्वारे गेल्या ६ वर्षात ५० हजार नागरिक जोडले गेले आहेत.

आता नदी संवर्धन कार्यात सहभागी होण्यासाठी आणखी आवाहन करण्यात आले आहे. सगळयांनी सक्रीय होऊन नदीला तिचा हक्क परत मिळवून द्यायची वेळ आली आहे. नोव्हेंबरमध्ये, राम-मुळा नद्यांच्या संगमावर सूर असलेले अनिधिकृत वाळू उत्खनन उघडकीस आणून संबधितांवर कारवाई करण्याच्या प्रक्रियेत जीवितनदीचा सहभाग होता. जीवितनदीच्या कार्यकर्त्यांनी एप्रिलपासून या कामावर लक्ष ठेवले होते. हा नदी संगमावरचा उत्कृष्ट नैसर्गिक नदीकाठ वाचवण्यासाठी, वैशाली पाटकर, पुष्कर कुलकर्णी जीवितनदी, आणि औंध, बाणेर, पाषाण, पिंपळे निलख येथील यांनी मिळून हे काम केले. यासाठी महानगरपालिका, जिल्हाधिकारी, पोलीस यांच्याबरोबर पाठपुरावा करण्यात आला. हे सर्व काम सुरु असतानाच  भारतीय नदी दिनाच्या औचित्याने जीवितनदी लिव्हिंग रिव्हर फाऊंडेशनला भगीरथ प्रयास सन्मान २०२० मिळाला आहे. इंडिया रिव्हर्स फोरमतर्फे, नदी संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थाना भगीरथ प्रयास सन्मान देऊन गौरविले जाते. जीवितनदीच्या संस्थापक-संचालक, शैलजा देशंपाडे, हा सन्मान स्विकारताना म्हणाल्या की, आमच्याशी संलग्न सर्व संस्था तसेच भारतातल्या वेगवेगळ्या भागात नद्यांच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या सर्व नदी योद्ध्यांना हा सन्मान अर्पण आहे.नद्यांच्या रक्षणासाठी लढणारे आर्किटेक्ट सारंग यादवाडकर यांनाही सन्मान मिळाला.

 

Web Title: My river, my responsibility : 50,000 citizens were added to the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.