Join us

'या' भूमिकेचा विधानसभेशी संबंध नाही; राज ठाकरेंचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2019 9:37 PM

राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या सभेत मोदींवर घणाघाती टीका केली आहे.

मुंबई- राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या सभेत मोदींवर घणाघाती टीका केली आहे. यावेळी त्यांनी मनसेची भूमिकाही स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, भाजपवाल्यांची कुजबुज सुरू आहे की राज ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणे वापरून घेत आहे. मी इतका वेडा नाहीये. बरं मी माध्यमांशी बोललो नसताना देखील मनसेला किती जागा मिळणार ह्याच्या चर्चा सुरू झाल्या. कुठे 3 जागा मिळणार, 2 जागा मिळणार अशाही बातम्या दाखवल्या जात होत्या.काँग्रेस-एनसीपीनं आघाडी केली. अजित पवारांनी विधान केलं मनसे हवी आहे, पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मनसे नको आहेत. मी अजित पवारांना फोन करून विचारलं. आम्ही तुमच्याबरोबर येण्यासाठी विचारलं आहे काय?, त्यानंतर मी काँग्रेसवाल्यांनाही फोन करू म्हटलं तुम्ही घेणार नाही म्हणता पण मी कुठे यायला तयार आहे. यावेळी त्यांनी मतदारांनाही आवाहन केलं आहे. मनात नसताना दुसरीकडे मतदान करायला लागल्यास एकदा केलं तर जातंय काय, असं ते मतदारांना उद्देशून म्हणाले आहेत. माझ्या या भूमिकेचा विधानसभेशी काहीही संबंध नाही. ही परिस्थिती अशी आहे आणि या परिस्थितीनुसार हा निर्णय घेतला आहे, असं राज ठाकरे म्हणाले आहे. त्यामुळे राज ठाकरे विधानसभा निवडणुकीत काय भूमिका घेणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करणार आहेत काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय.  

टॅग्स :राज ठाकरेलोकसभा निवडणूकमनसे