Uddhav Thackarey : 'आदित्य आल्यापासून माझा ताण कमी झालाय, आमची चौथी पिढी जनसेवेत'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 04:55 PM2022-01-01T16:55:51+5:302022-01-01T17:11:20+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, नवीन वर्ष सुख, समृद्धी आणि भरभराटीचे जाओ ही सदिच्छा देत आपल्या भाषणाला सुरुवात केली.

My stress has eased since Aditya came, our fourth generation in public service, uddhav thackrey on mumbai | Uddhav Thackarey : 'आदित्य आल्यापासून माझा ताण कमी झालाय, आमची चौथी पिढी जनसेवेत'

Uddhav Thackarey : 'आदित्य आल्यापासून माझा ताण कमी झालाय, आमची चौथी पिढी जनसेवेत'

Next
ठळक मुद्देआता हा ताण आदित्यने कमी केलाय. तो, आता आपल्या सर्वांसोबत पाहणी करत आहे, असे म्हणत शिवसेनेची चौथी पिढी सेवेत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.  

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांना उद्देशून भाषण केले. आपल्या भाषणात मुख्यमंत्री कोरोना निर्बंधाबाबत बोलतील, असेच अनेकांना वाटत होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी नगर विकास विभागाच्या अनुषंगाने संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी सर्वसामान्य मुंबईकरांना मोठी भेट दिली असून ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरावरील मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच, मुंबईकरांचं शिवसेनेवर प्रेम आहे, म्हणूनच शिवसेनेची चौथी पिढी मुंबईच्या सेवेत आहे, असेही ठाकरे यांनी म्हटलं.   

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, नवीन वर्ष सुख, समृद्धी आणि भरभराटीचे जाओ ही सदिच्छा देत आपल्या भाषणाला सुरुवात केली. मुंबईच्या जनतेला 500 चौ फुटापर्यंतच्या घरावरील मालमत्ता कर माफ करण्याच्या निणर्याची तत्काळ अंमलबजावणी करा अशा सुचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या. या निर्णयाचा मुंबईतील साधारणत: १६ लाख कुटुंबांना लाभ होईल.

१९६६ पासून जन्माला आलेली शिवसेना मुंबईकरांच्या आशीर्वादाने मुंबई सांभाळतेय. आमची ही चौथी पिढी, आजोबा, वडील, मी आणि आता आदित्य. काम म्हणून नाही, कर्तव्य म्हणून नाही तर मुंबईवरचं प्रेम आम्ही पुढे नेत आहोत. मला तेही दिवस आठवतात शिवसेनाप्रमुख स्वत: जातीने जाऊन कामांची पाहणी करत, सूचना देत होते. मीही नालेसफाई, दहिसर नदीचे काम असेल किंवा सौंदर्यीकरणाचे काम असेल ते जाऊन पहात होतो. आता हा ताण आदित्यने कमी केलाय. तो, आता आपल्या सर्वांसोबत पाहणी करत आहे, असे म्हणत शिवसेनेची चौथी पिढी सेवेत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.  

विरोधकांना लगावला टोला

सुविधा द्यायच्याच आहे, नालेसफाई, सौंदर्यीकरण असेल, नदीसफाई असेल, पण हे करतांना मुंबईकरांना दिलासाही द्यायचा आहे. मुंबईकर म्हणजे नुसते कर भरणारे नाही. दोन्ही हाताने सगळ्यांना पैसा देणारा हा मुंबईकर राज्याच्या विकास कामांमध्ये मोलाचे योगदान देतो. पण त्याला परत काय मिळतं हा खरा प्रश्न आहे. मतदानापूर्वी तारे तोडून आणण्याची भाषा करणारे नंतर पाच वर्षे काहीच बोलत नाहीत. शिवसेना हे असे अजिबात करत नाहीत, असे म्हणत विरोधकांना टोलाही लगावला. 

शिवसेनेसोबत आता आणखी काही मित्र आले. मग राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल. शिवसेनाप्रमुखांनी आखून दिलेली परंपरा शिवसेना जपते. जे काम जमणार असेल तेच वचन द्यायचे, जे जमणार नाही अशी खोटे वचने द्यायची नाहीत, त्यांची हीच परंपरा आपण पुढे नेत आहोत. २०१७ ला जे निवडणूकीत शिवसेनेने जे वचन दिले ते पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, यातील बहूतांश वचने पूर्ण केली. आज एक महत्वाचे वचन या निर्णयाने पूर्ण होत आहे.

५०० चौ. फुटापर्यंतच्या घराच्या मालमत्ताकर माफ करणे हे महत्वाचे वचन आपण आज पूर्ण करत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांना सर्वांना मुंबईकरांच्यावतीने धन्यवाद देतो. देशाचा आर्थिक केंद्र असणाऱ्या मुंबईकरांना हा दिलासा देण्याचा प्रयत्न. ज्यांनी कष्ट करून घाम गाळून मुंबईला उभी केली त्यांच्यासाठी हा निर्णय, त्यांच्यासाठीच्या वचनाला आपण आज जागलो आहोत. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करा. सामान्य माणसांचे जीवन सुसह्य करण्‍याचा हा प्रयत्न आहे. मला जाणीव आहे की केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेला देणे हे आपले कर्तव्यच आहे, असेही ठाकरेंनी म्हटले. 

एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

· मुंबईकरांचा ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ
· सर्वसामान्य नागरिकांना दिलासा, १६  लाख कुटुंबांना लाभ, मुंबईकरांसाठी महत्वाकांक्षी आणि क्रांतीकारी निर्णय, नवीन वर्षाचं मोठी भेट
· मुख्यमंत्र्यांच्या मनात मुंबईकरांसाठी तळमळ
· रुग्णालयात असूनही जनतेचे काम, शिवसेना दिलेल्या वचनाला जागते, दिलेला शब्द पाळते
· कोविड काळात विकास कामांना कात्री नाही, सर्वसामान्यांच्या हिताचा हा निर्णय

आदित्य ठाकरेंनी मानले आभार

मी हा अतिशय महत्वाचा निर्णय घेतल्याबद्धल मुख्यमंत्र्यांचे आणि नगरविकास मंत्री तसेच पालिका आयुक्त, नगरविकास अधिकारी या सर्वांचे मनापासून आभार मानतो
 

Web Title: My stress has eased since Aditya came, our fourth generation in public service, uddhav thackrey on mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.