Join us

मेरा टाईम आएगा...! रॉबर्ट वाड्रांचे राजकारणात एन्ट्रीचे संकेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 5:28 PM

मुंबईतील मुंबादेवीच्या दर्शनाला वाड्रा आज आले होते. यावेळी त्यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली.

मुंबई : भ्रष्टाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या टीकेचे धनी ठरलेले काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी राजकारणात एन्ट्री करण्याचे संकेत दिले आहेत. 'मेरा टाईम आएगा', असे सांगत राजकारण शिकत असल्याचे सांगितले. तसेच गेल्या पाच वर्षांत खूप सोसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 

मुंबईतील मुंबादेवीच्या दर्शनाला वाड्रा आज आले होते. यावेळी त्यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने गेल्या पाच वर्षांत दिलेल्या त्रासालाही वाचा फोडली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्र्यांनी अनेकदा गेल्या पाच वर्षांत भ्रष्टाचारामध्ये माझे नाव घेतले आहे. मात्र, आरोप सिद्ध करू शकले नाहीत. मी भारतातच राहतो. तपास यंत्रणांना माझ्या घराचा पत्ता माहिती आहे. कार्यालयाबाहेरही नजर ठेवली जाते. बऱ्याचदा उन्हात उभ्या असलेल्या त्या अधिकाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलावून चहा पाजतो. भाजपाच्या टीकेचा त्रास मुलांनाही होत असल्याचे वाड्रा यांनी सांगितले. 

तसेच देशातील वातावरणावरही त्यांनी भाष्य केले. देशातील व्यापारी, दुकानदार आणि सामान्य माणूस त्रस्त असल्याचे ते म्हणाले. यामुळे देशात बदलाचे संकेत दिसत असल्याचे सांगत येत्या 23 मे रोजी सारे काही स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले. 

तसेच देशातील वातावरणावरही त्यांनी भाष्य केले. देशातील व्यापारी, दुकानदार आणि सामान्य माणूस त्रस्त असल्याचे ते म्हणाले. यामुळे देशात बदलाचे संकेत दिसत असल्याचे सांगत येत्या 23 मे रोजी सारे काही स्पष्ट होईल, असेही ते म्हणाले. लोक घाबरलेले असल्याने ते बोलणार नाहीत मात्र त्यांना बदल हवा आहे. महिला सशक्तीकरण, रोजगार, भारताला पुढे न्यायचे आहे. आम्हाला कायम द्वेषाच्या नजरेतून पाहिले जात आहे. वैयक्तीक आरोप करणे चुकीचे आहे. देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्यांबद्दल ते बोलत आहेत. सर्व जग पाहत आहे, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :रॉबर्ट वाड्राकाँग्रेसनरेंद्र मोदीभाजपा