Kirit Somaiya: माझी पत्नी प्राध्यापिका अन् सुनबाई मराठी; घरात आम्ही मराठीतच बोलतो- किरीट सोमय्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 04:36 PM2022-02-28T16:36:16+5:302022-02-28T16:38:23+5:30
शिवसेनेच्या टीकेला किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई- भाजपाचे नेते किरीट सोमय्या एकेकाळी मुंबईतील मराठी शाळांमध्ये मराठीची सक्ती नको यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती. आता तेच मराठी कट्टे घेतात. हा ढोंगीपणा आहे, अशी टीका संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. या टीकेला आता किरीट सोमय्या यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत यांच्या टीकेवर किरीट सोमय्या म्हणाले की, माझी पत्नी प्राध्यापिका आहे. माझी सुनबाई मराठी आहे. त्यामुळं कदाचित त्यांच्यापेक्षा माझं मराठी चांगलं आहे. मराठी भाषा समृद्ध आहे. ही फक्त भाषेची समृद्धी नाही म्हणणार. माझा, माझ्या वडिलांचा आणि मुलाचा जन्म इथेच झाला आहे. त्यामुळं महाराष्ट्र आणि राज्याचा आम्हाला अभिमान आहे, असं किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, सोमय्या यांनी ठाकरे सरकारच्या डर्टी डझन नेत्यांची लिस्ट जाहीर केली आहे. यामध्ये आणखी दोन नावांचा समावेश करण्याचे मी विसरलो होतो. यामध्ये यशवंत जाधव, यामिनी जाधव यांचे कुटुंब आणि महापौर किशोरी पेडणेकर यांचे नाव असल्याचे सोमय्या यांनी म्हटले. ठाकरे सरकारच्या 'डर्टी डझन' नेत्यांच्या घोटाळ्यांवर कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी मी आज दिल्लीत विविध अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.