लोकलमधून पडून मायलेक जखमी, आत्महत्येचा अंदाज

By admin | Published: October 27, 2015 01:43 AM2015-10-27T01:43:22+5:302015-10-27T01:43:22+5:30

विद्याविहार स्थानकाजवळ रविवारी रात्री धावत्या लोकलमधून पडून एका महिलेसह तिची आठ महिन्यांची मुलगी जखमी झाली.

Mylake injured by locals, estimates of suicide | लोकलमधून पडून मायलेक जखमी, आत्महत्येचा अंदाज

लोकलमधून पडून मायलेक जखमी, आत्महत्येचा अंदाज

Next

मुंबई : विद्याविहार स्थानकाजवळ रविवारी रात्री धावत्या लोकलमधून पडून एका महिलेसह तिची आठ महिन्यांची मुलगी जखमी झाली. दोघींनाही उपचारासाठी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिलेला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी तपास सुरू केला असून, ही आत्महत्या असू शकते, असा अंदाज वर्तविला आहे. मोनिका वैती (२१) आणि काव्या अशी दोघींची नावे आहेत.
मुलुंड गवाणपाडा येथे मोनिका वैती राहते. खासगी वाहन चालक असलेल्या पती निखिलसोबत तिचे रविवारी संध्याकाळी किरकोळ भांडण झाले. राग मनात धरून मोनिका आपली मुलगी काव्याला घेऊन त्वरित घराबाहेर पडली. जवळपासच मोनिकाचे माहेर असल्याने ती माहेरी गेली असावी, असे वाटल्याने निखिलने शोध घेतला नाही. मोनिका रात्री उशिरापर्यंत घरी आली नसल्याने त्याने रेल्वे पोलिसांकडे तक्रार केली.
रात्री साडेअकराच्या सुमारास विद्याविहार स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर एक महिला तिच्या लहान मुलीसह जखमी अवस्थेत पडल्याची माहिती कुर्ला रेल्वे पोलिसांना मिळाली. ओळख पटल्यानंतर त्याची माहिती निखलला देण्यात आली.

Web Title: Mylake injured by locals, estimates of suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.