बेपत्ता झालेल्या २५७ अल्पवयीन मुलींचे गूढ कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 01:33 AM2019-01-22T01:33:00+5:302019-01-22T01:33:04+5:30

गेल्या वर्षभरात मुंबईतून १ हजार ३३९ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. यापैकी १ हजार ८२ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले.

The mysteries of 257 missing minor girls remained intact | बेपत्ता झालेल्या २५७ अल्पवयीन मुलींचे गूढ कायम

बेपत्ता झालेल्या २५७ अल्पवयीन मुलींचे गूढ कायम

Next

मुंबई : गेल्या वर्षभरात मुंबईतून १ हजार ३३९ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या. यापैकी १ हजार ८२ मुलींचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले. तर २५७ मुलींचे गूढ अजूनही कायम असल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलिसांच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांकडून विविध उपक्रम राबवूनदेखील बलात्कार, छेडछाड, अश्लील वर्तन, विनयभंग आणि हुंड्यासाठी छळ असा महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा आकडा वाढतच आहे. धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलींवर होणाºया अत्याचारांच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होत असून ही एक चिंतेची बाब बनत चालली आहे.
गेल्या वर्षभरात ५७० अल्पवयीन मुली विकृत वासनेच्या बळी ठरल्या. त्यापैकी ५५३ गुन्ह्यांची उकल झाली. त्यापाठोपाठ मुंबईतून १ हजार ३३९ मुली बेपत्ता झाल्या. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. २०१७ च्या तुलनेत बेपत्ता झालेल्या मुलींची संख्या ६५ ने वाढली आहे. २०१८ च्या वर्षाअखेरीस मुली गायब होण्याचे प्रमाण अधिक आहे. यापैकी १ हजार ८२ मुलींचा शोध घेतला. मात्र २५७ अल्पवयीन मुली अजूनही बेपत्ता आहेत. त्या कुठे आहेत, कुठल्या अवस्थेत आहेत, याचे गूढ कायम आहे. मुंबई पोलिसांकडून याबाबत तपास सुरू आहे.
>पोलीस दीदी उपक्रमातून फुटतेय गुन्ह्यांना वाचा...
अल्पवयीन मुलांवरील अत्याचार रोखण्यास मुंबई पोलिसांकडून शाळांमध्ये पोलीस दीदी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत चिमुरड्यांना लैंगिक शिक्षणाचे धडे शिकविण्यात येत आहेत. मुलांना चांगल्या, वाईट स्पर्शाची जाणीव करून देण्यात येत आहे. यादरम्यान विविध गुन्हे उघडकीस आले. तर काही ठिकाणी अल्पवयीन मुलांच्या सतर्कतेमुळे अतिप्रसंग टळला. तसेच पालकांनीही मुलांची काळजी घेत, पाल्यांना लैंगिक शिक्षणाबाबत माहिती देणे गरजेचे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याचबरोबर मुंबई पोलिसांच्या टिष्ट्वटर हॅण्डलवरूनही याबाबत जनजागृती केली जात आहे.

Web Title: The mysteries of 257 missing minor girls remained intact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.