मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचे गूढ कायम असून, त्या कारचालकाचा शोध घेण्यास पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेल्या स्फोटके असलेल्या कार आणि धमकीप्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत. अशात राष्ट्रीय तपास यंत्रणाही समांतर तपास करत आहेत.
स्कॉर्पियो पार्क करणारा चालकसोबत आलेल्या इनोव्हामध्ये बसून पसार झाला. त्या इनोव्हाचा शोध घेण्यास गुन्हे शाखेच्या वेगवेगळी पथके काम करत आहे. मात्र अद्याप त्यांच्या हाती काहीही लागलेले नाही तर दुसरीकडे ‘जैश उल हिंद’ या संघटनेच्या माध्यमाने टेलिग्रामवरून या धमकी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या पोस्ट खाली दिलेल्या लिंकमधील बँक खाते अस्तित्वात नसल्याचे गुन्हे शाखेच्या चौकशीत समोर आले. त्यामुळे ही पोस्ट बनावट असल्याचा अंदाज गुन्हे शाखेकडून वर्तविण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.