भयंकर! आईस्क्रिममध्ये सापडलेल्या मानवी बोटाचं रहस्य उलगडलं; समोर आला DNA रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 11:20 AM2024-06-28T11:20:34+5:302024-06-28T11:39:05+5:30

मालाड येथे काही दिवसांपूर्वी आईस्क्रिम कोनमध्ये मानवी बोट आढळलं होते. त्या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. 

Mystery of human finger found in ice cream revealed; DNA report came out | भयंकर! आईस्क्रिममध्ये सापडलेल्या मानवी बोटाचं रहस्य उलगडलं; समोर आला DNA रिपोर्ट

भयंकर! आईस्क्रिममध्ये सापडलेल्या मानवी बोटाचं रहस्य उलगडलं; समोर आला DNA रिपोर्ट

मुंबई - मालाड परिसरात एका आईस्क्रिम कोनमध्ये सापडलेल्या मानवी बोटाचं रहस्य उलगडलं आहे. या प्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांना हे बोट कुणाचे याचा शोध लागला आहे. हे बोट आईस्क्रिम फॅक्टरीत कामाला असणाऱ्या कर्मचाऱ्याचे असल्याचं निष्पन्न झालं आहे. पोलिसांनी मानवी बोटाचं डिएनए टेस्ट केले होते. त्यातून कापलेले बोट हे त्याच कर्मचाऱ्याचे असल्याचे समोर आले आहे जो पुण्यातील इंदापूर येथे आईस्क्रिम फॅक्टरीत काम करतो. 

पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, फॉरेन्सिक लॅबमधून समोर आलेल्या डिएनए रिपोर्टनुसार मानवी बोट आणि फॅक्टरीत काम करणारा कर्मचारी ओमकार पोटे यांचा डिएनए एकच आहे. इंदापूर फॅक्टरीत आईस्क्रिम बनवण्याच्या प्रक्रियेत पोटे यांच्या हातातील एक बोट कापले गेले. त्यानंतर हेच बोट मालाडमधील एका डॉक्टरांनी मागवलेल्या आईस्क्रिम कोनमध्ये सापडले. त्यानंतर पोलिसांकडे या प्रकरणी तक्रार नोंदवली गेली. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?

१८ जून रोजी मुंबईच्या एका डॉक्टरला आईस्क्रिम कोनमध्ये कापलेले मानवी बोट सापडले. याप्रकरणी त्यांनी व्हिडिओ बनवून शेअर केला. पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर याचा तपास सुरू झाला. तपासात ज्यादिवशी आईस्क्रिम पॅक करण्यात आली तेव्हा फॅक्टरीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या हाताला दुखापत झाल्याचं समोर आले. त्यानंतर आईस्क्रिममध्ये सापडलेले बोट आणि कर्मचाऱ्याचा डिएनए तपासण्यात आला. त्यानंतर आता डिएनए रिपोर्टमधून आईस्किममधील बोट आणि त्या कर्मचाऱ्याचा डिएनए एकच असल्याचं समोर आले आहे.

दरम्यान, फूड सेफ्टी स्टँडर्ड्स ऑफ इंडिया (FSSAI) ने Yummo या आइस्क्रीम पुरवणाऱ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा परवाना निलंबित केला आहे. अन्न सुरक्षा नियामकाने सांगितले की, FSSAI च्या पश्चिम विभागीय कार्यालयातील एका पथकाने आइस्क्रीम बनवणाऱ्या कंपनीच्या परिसराची तपासणी केली असून त्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. कंपनीने तपासात सहकार्य करण्याचे पूर्ण आश्वासन दिले आहे. हा कारखाना सील करण्यात आला आहे. पोलिसांत तक्रारीनंतर कंपनीविरुद्ध खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करून मानवी जीव धोक्यात आणल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला.
 

Web Title: Mystery of human finger found in ice cream revealed; DNA report came out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.