‘त्या’ वस्तूंचे गूढ कायम

By admin | Published: May 26, 2015 02:02 AM2015-05-26T02:02:16+5:302015-05-26T02:02:16+5:30

मुंबईत विमानतळाच्या धावपट्टीकडे पाच मानवरहित उडत्या वस्तू येताना दिसून ४८ तास उलटले तरी ते नेमके काय होते याचे कोडे उलगडलेले नाही.

The 'mystery' of those things remains constant | ‘त्या’ वस्तूंचे गूढ कायम

‘त्या’ वस्तूंचे गूढ कायम

Next

डिप्पी वांकाणी - मुंबई
मुंबईत विमानतळाच्या धावपट्टीकडे पाच मानवरहित उडत्या वस्तू येताना दिसून ४८ तास उलटले तरी ते नेमके काय होते याचे कोडे उलगडलेले नाही. ते पॅराशूट होते की चिनी अकाशदिवे होते याविषयी कोणताही निश्चित निष्कर्ष मुंबई पोलीस वा विमानतळ अधिकारी काढू शकलेले नाहीत. जुहू किनाऱ्यावर काही जणांनी सोडलेले आकाशदिवे विमानतळावर दिसले असावेत, असे पोलीस सांगत असले तरी काही जणांना ती चिनी खेळणी असावीत असे वाटते.
प्रसारमाध्यमांत या घटनेचा चर्चा होऊनही दहशतवादविरोधी पथकाला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगण्यात आलेले नाही हे विशेष. आमच्याकडे कोणीही संपर्क साधलेला नाही की आम्ही या प्रकरणात लक्ष घातलेले नाही. परंतु आम्हाला असे वाटते की त्या वस्तू चिनी दिवे असावेत. यापूर्वीही असे दिवे नागरी वसाहतींत उतरले व त्यांच्यातील आॅक्सिजन व हायड्रोजन वायू नष्ट झाल्याच्या घटना घडल्या आहेत, असे एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
पॅराग्लायडिंग असोसिएशन आॅफ इंडियाचे अध्यक्ष मनोज रॉय यांनी सांगितले की, या प्रकरणातील त्या वस्तू मानवविरहीत असल्यामुळे यात कोणताही पॅराग्लायडर सहभागी नाही. ते रिमोट कंट्रोलने नियंतित केलेले पॅराशूट असू शकतील, या वृत्ताबाबत विचारले असता राय यांनी मी तर हे पहिल्यांदाच ऐकले आहे. पॅराशूटस् रिमोट कंट्रोलने नियंत्रित करण्याविषयी मी कधीही ऐकलेले नाही. मुंबई पोलीस ते चिनी दिवे असल्याचे सांगत आहेत व चिनी खेळणीही असू शकतील असे त्यांना वाटते. मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पॅराशूटस् हे खाली येणारे उपकरण असून त्याला रिमोट कंट्रोलने नियंत्रित करण्याची गरज नाही. पॅराशूट हे खाली येणारेच असतात. दरम्यान, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्या वीणा चिपळूणकर यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, त्या वस्तू नेमक्या काय होत्या हे आम्ही निश्चितपणे ठरवू शकलेलो नाही. मुंबई पोलीस या प्रकरणात लक्ष घालत आहेत.

शनिवारी सायंकाळी ६च्या सुमारास अ‍ॅप्रन कंट्रोल रूमने धावपट्टीच्या दिशेने पाच उडत्या वस्तू येताना बघितल्यावर एअर ट्रॅफीक कंट्रोलला सावध केले. त्यानंतर लगेचच एटीसीने त्या वस्तू दक्षिण-पश्चिम दिशेने धावपट्टीकडे येत असल्याचे बघून विमानाचे उड्डाण व तळावर प्रवेश करताना काळजी घेण्यास पायलटांना सांगितले. जेट एअरवेजचे उड्डाण थांबविण्यास सांगण्यात आले व दुसऱ्या एका विमानाला पुढील सूचना मिळेपर्यंत न उतरता विमानतळाभोवती घिरट्या घालण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: The 'mystery' of those things remains constant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.