Join us

बोलीभाषेतील पौराणिक गाणी गाजताहेत

By admin | Published: September 01, 2014 10:38 PM

ग्रामीण भागातून पुराण कथा आणि ऐतिहासिक प्रसंग उभे करणा:या आगरी बोली भाषेतील गाणी आणि त्यावर होणा:या महिलांच्या भवर नृत्यांचा फिवर चढल्याचे दिसून येत आहे. पु

अजित पाटील ल्ल चिरनेर
कालर्पयत गणोशोत्सवात देखावे आणि ऑर्केस्ट्राच्या गाण्यांची विशेष डिमांड असायची, मात्र यावर्षी उरणच्या चिरनेर खो:यातील ग्रामीण भागातून पुराण कथा आणि ऐतिहासिक प्रसंग उभे करणा:या आगरी बोली भाषेतील गाणी आणि त्यावर होणा:या महिलांच्या भवर नृत्यांचा फिवर चढल्याचे दिसून येत आहे. पुराणातील आणि इतिहासातील अनेक प्रसंग उभे करणारी ही गाणी रसिकांच्या अंगावर शहारे आणत आहेत. सेझसारख्या प्रकल्पांचा धोका आणि महामुंबई सेझच्या विरोधात लढली गेलेली स्थानिकांच्या अस्तित्वाची लढाई आदी अनेक समस्या या गाण्यांतून मांडल्या.
सध्या गणोशोत्सवाच्या हंगामात अनेकविध उडत्या चालीवरच्या गाण्यांच्या सीडी बाजारात आलेल्या पहायला मिळतात, मात्र उरणच्या पूर्व भागात अशाप्रकारच्या सीडीपेक्षा लाईव्ह गाणी बोलणा:या आणि त्यावर फेर धरणा:या महिलांना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. सीता स्वयंवर, रामाचा वनवास, रावणाचे गर्वहरण, अहिल्येची कथा, द्रौपदीवर बेतलेला प्रसंग, लवकुशांची कथा, शबरीची भक्ती आदी पौराणिक विषयांसह छत्रपती शिवराय, बाजी प्रभूंची पावनखिंड, नरवीर तानाजी मालुसरेंचा पराक्रम आदी अनेक विषयांवर अगदी तालबद्धपणो गाणो गाणा:या महिलांना गणपती उत्सवाच्या निमित्ताने खास जागरणासाठी बोलावले जात आहे. यामध्ये काही प्रमाणात आधुनिकतेचा लूक देताना जुन्या पौराणिक आणि ऐतिहासिक गाण्यांबरोबरच समाजाला सध्या भेडसावणा:या अनेक समस्यांवरही आसूड ओढण्याचा प्रय} या महिलांकडून केला जात आहे. 
मुलगी जन्माचे स्वागत करा, असा संदेश ही या गाण्यांच्या माध्यमातून देण्याचा प्रय} या निमित्ताने होत आहे.  त्यातच नव्या पिढीला लागलेले मोबाइलचे वेड, फॅशनचा अतिरेक, धावपळीचे जीवन आदी विषयांवर अचूकपणो वर्मावर बोट ठेवण्याचे काम होत आहे. उरणच्या पूर्व भागातील खोपटे, आवरे, गोवठणो, पाले, पिरकोन, कोप्रोली, पाणदिवे, कळंबुसरे, वशेणी, सारडे, चिरनेर, भोम, टाकीगाव, विंधणो आदी गावांमध्ये अशा प्रकारच्या गाण्यांवर महिला फेर धरीत असल्याचे दिसून येत आहेत. एक ढोलके वाजविणारा पुरुष आणि बाकी सर्व महिला अशा गाण्यांवर सुंदर अशा जुन्या चालींवर बोलून फेर धरीत असल्याने यातून संस्कृती जतनाचे काम होत असल्याचे निवृत्त प्राथमिक शिक्षक रा. र. पाटील यांनी सांगितले. 
 
राजकीय पक्षही सरसावले
विशेषत: निवडणुकांचा हंगाम असल्याने अशा  मंडळांना विविध राजकीय पक्षाच्या  बडय़ा कार्यकत्र्याच्या आणि प्रतिष्ठितांच्या गणपतीच्या जागरणाच्या सुपा:या मिळत असल्याची माहिती अशी पौराणिक गाणी गाण्यात माहीर असलेल्या मंदाताई लहू पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली.