Mumbai University: मुंबई विद्यापीठाला नॅककडून सात वर्षांसाठी मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 09:52 AM2021-10-12T09:52:11+5:302021-10-12T09:53:18+5:30

Mumbai University: मुंबई विद्यापीठाला नुकतेच नॅककडून अ   श्रेणीसह ३.६५ एवढे सर्वाधिक गुणांकन मिळाले आहे. याशिवाय राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्ययन परिषदेकडेकडून (नॅक) कडून मुंबई विद्यापीठाला पाचऐवजी सात वर्षांसाठी मान्यतेची मुदतवाढ मिळाली आहे. 

NAC extends Mumbai University for seven years | Mumbai University: मुंबई विद्यापीठाला नॅककडून सात वर्षांसाठी मुदतवाढ

Mumbai University: मुंबई विद्यापीठाला नॅककडून सात वर्षांसाठी मुदतवाढ

googlenewsNext

मुंबई : मुंबई विद्यापीठाला नुकतेच नॅककडून अ   श्रेणीसह ३.६५ एवढे सर्वाधिक गुणांकन मिळाले आहे. याशिवाय राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्ययन परिषदेकडेकडून (नॅक) कडून मुंबई विद्यापीठाला पाचऐवजी सात वर्षांसाठी मान्यतेची मुदतवाढ मिळाली आहे. 
मूल्यांकनानंतर सर्वसाधारणपणे ही मुदत पाच वर्षांची असते. मात्र पूर्वीच्या सर्वोच्च गुणवत्तेच्या निकषानुसार  मुंबई विद्यापीठास ही सात वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे. यापूर्वी विद्यापीठास २००१ ला ‘फाईव्ह स्टार’ (सर्वाधिक श्रेणी) त्यानंतर २०१२ ला ‘अ’ (सर्वाधिक श्रेणी) प्राप्त झाली होती. याच निकषांवर तिसऱ्यांदा सर्वाधिक गुणांकनासह अ   श्रेणी प्राप्त झाल्याने पाच वर्षांऐवजी सात वर्षांसाठी मान्यतेची मुदतवाढ मिळाली आहे. यानुसार आता मुंबई विद्यापीठाकडे २०२८ पर्यंत नॅकचा दर्जा असणार आहे.
नॅककडून सर्वाधिक गुण मिळवणारे मुंबई विद्यापीठ हे राज्यातील  पहिले विद्यापीठ ठरले आहे. नॅक पीअर टीमने २४ ते २६ ऑगस्ट २०२१ दरम्यान मुंबई विद्यापीठास मूल्यांकनासाठी भेट दिली  होती. विद्यापीठाने विविध विद्याशाखांतर्गत दिलेले भरीव योगदान, संशोधनवृतीला चालना, सुसज्ज प्रयोगशाळा, विद्यार्थी विकास अशा सर्व बाबतींत विद्यापीठाने संख्यात्मक आणि गुणात्मक अशा निकषांवर विद्यापीठाने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. 

नॅककडून मुंबई विद्यापीठास अ   च्या श्रेणीसह सर्वाधिक गुणांकन प्राप्त होणे हे अत्यंत अभिमानास्पद आहेच यात वाद नाही. मात्र २००१ ला प्राप्त झालेली ‘पंचतारांकित श्रेणी’ आणि २०१२ ला मिळालेला सर्वाधिक श्रेणीचा ‘अ’ दर्जा या सर्वोत्तम कामगिरीमुळे मुंबई विद्यापीठास मान्यतेची सात वर्षांसाठीची मुदतवाढ ही खूप मोठी जमेची बाब असून, हा विद्यापीठास प्राप्त झालेला बहुमान आहे.     - प्रा. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
मुंबई विद्यापीठाने मैलाचा दगड ठरेल अशी कामगिरी केली आहे. पाच वर्षांऐवजी सात वर्षांच्या मुदतवाढीमुळे आता विद्यापीठ ग्रेड वन ऑटोनॉमी तसेच युनिव्हर्सिटी विथ एक्सलेंसला पात्र ठरणार आहे. त्याचबरोबर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रथम श्रेणीतील ‘संशोधन विद्यापीठ’ म्हणूनही विद्यापीठाचे स्थान अधोरेखित होणार आहे.
– प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू, मुंबई विद्यापीठ
 

Web Title: NAC extends Mumbai University for seven years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.